Manasvi Choudhary
मराठी नववर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा या सणाला मराठी पारंपारिक सजावट केली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी महिला व पुरूष मराठमोळा लूक करतात. या दिवशी महिला खास पारंपारिक साजश्रृंगार करतात.
यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्हाला देखील पैठणी साडी नेसायची असल्यास आजच खरेदी करा.
बाजारात पैठणी साडीच्या अनेक लेटेस्ट डिझाईन्स उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची या विषयी आज आम्ही सांगणार आहोत.
अस्सल खऱ्या महाराष्ट्रीयन पैठणीची जर कधीही काळी पडत नाही हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
हातमागावर बनवलेल्या पैठणी साडीत धागा कुठेही दिसत नाही दोन्ही बाजूंनी ही पैठणी एकसारखीच दिसते.
हातमागवर बनवलेल्या पैठणीची किंमत १० हजारपासून सुरू होते. मशीनने बनलेली पैठणी या दरात स्वस्त असते.
आधुनिक काळात ही खूप लोकप्रिय आहे. यात साडीचा काठ सोन्याच्या किंवा चांदीच्या जरिचा असतो, ज्यामुळे साडीला लक्झरी लूक असतो