प्रसिद्ध अभिनेत्याची कोट्यवधींची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये परताव्याच्या नावाखाली लुटलं

Actor Amar Upadhyay : 'क्यू की सास भी कभी बहू थी' फेम अभिनेता अमर उपाध्यायची कोट्यवधींची फसवणुक झाली आहे.
Actor Amar Upadhyay Files Case Against Investment Firm
Actor Amar Upadhyay Files Case Against Investment FirmSaam Tv

'क्यू की सास भी कभी बहू थी' फेम अभिनेता अमर उपाध्यायची फसवणूक झाली आहे. शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका जोडप्याने अभिनेत्याची तब्बल सव्वा कोटींची फसवणुक केली आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी सव्वाकोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Actor Amar Upadhyay Files Case Against Investment Firm
Kriti Sanon : "हिट चित्रपट न देणाऱ्या पुरुष कलाकारांनाही फी जास्त..."; क्रिती सेनन बॉलिवूड निर्मात्यांवर संतापली

अभिनेता अमर उपाध्याय याची फसवणूक करणाऱ्या आरोपी जोडप्याचे नाव कुणाल शहा आणि हिनल मेहता आहे. ते दोघेही डायलाईट्स इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या दोघांनी शेअरमध्ये चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून फसवणुक केल्याचा आरोप आहे.

Actor Amar Upadhyay Files Case Against Investment Firm
Srikanth Film : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला, राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक

या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, अभिनेत्याने सुरुवातीला २० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. यानंतर जर अभिनेत्याने अधिक गुंतवणूक केली तर तो २०२६ पर्यंत ५ कोटी ते १५ कोटी रुपये कमवू शकतो, असं अभिनेत्याने सांगण्यात आले होते. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.

Actor Amar Upadhyay Files Case Against Investment Firm
Shrikanth Film : राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, जाणून घ्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com