Kriti Sanon : "हिट चित्रपट न देणाऱ्या पुरुष कलाकारांनाही फी जास्त..."; क्रिती सेनन बॉलिवूड निर्मात्यांवर संतापली

Kriti Sanon News : आजही अभिनेत्रींना अभिनेत्यांच्या तुलनेत कमी मानधन मिळतं, असं वक्तव्य क्रिती सेनन केलं आहे. अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या वागणुकीवर तिने भाष्य केले आहे.
Kriti Sanon
Kriti Sanon Saam TV

अभिनेत्री क्रिती सेनन (Actress Kriti Sanon) नुकतीच 'क्रू' चित्रपटातून (Crew Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटातून अभिनेत्री बरीच प्रकाशझोतात आली होती. हा चित्रपट खरंतर स्त्री प्रधान चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केलेली होती.

नुकतंच अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीत तिने बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे. आजही अभिनेत्रींना अभिनेत्यांच्या तुलनेत कमी मानधन मिळतं, असं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रींना मिळत असलेल्या वागणुकीवर तिने भाष्य केले आहे.

Kriti Sanon
Srikanth Film : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला, राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक

नुकतंच अभिनेत्रीने 'फिल्म कॅम्पिनियन'ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा १० पट जास्त का मानधन मिळतं ? असा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी मुलाखतीत क्रिती सेनन म्हणाली, "आजही विनाकारण अभिनेत्यांमध्ये आणि अभिनेत्रींमध्ये मानधनाच्या बाबतीत खूप मोठी तफावत आहे. कधी कधी विनाकारण असं वाटतं की, ज्या अभिनेत्याने गेल्या १० वर्षांत एकही हिट चित्रपट दिला नसला तरही त्याला १० पट जास्त फी मिळत आहे."

क्रिती सॅननने पुढे मुलाखतीत सांगितले की, "अनेकदा फिल्म प्रोड्युसर म्हणतात की ही रिकव्हरी आहे. ही डिजिटल आणि सॅटेलाइट रिकव्हरी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी होते. काहीही चूका होण्याआधी, डिजिटल आणि सॅटेलाइटमधून बजेट काढले जाते. कारण पुरूषकेंद्रित चित्रपटांना ओटीटी आणि टिव्हीवर महिला केंद्रीत चित्रपटांपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळतो."

Kriti Sanon
Shrikanth Film : राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, जाणून घ्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल

'क्रू' चित्रपटात निर्माते जास्त पैसे इन्व्हेस्ट करणार नव्हते, स्त्री प्रधान चित्रपट असल्यामुळे ते जास्त इन्व्हेस्टमेंट करणार नव्हते, असं मुलाखतीत क्रिती सेनन म्हणाली. करीना कपूर खान, तब्बू आणि स्वतः क्रिती अशा दमदार अभिनेत्री मुख्य भूमिकेत होत्या. त्या ऐवजी निर्माते तीन अभिनेत्यांच्या कॉमेडी चित्रपटात इन्व्हेस्टमेंट करणार होते. काजोल देवगनसोबत 'दो पत्ती' चित्रपटात क्रितीही दिसणार आहे. या चित्रपटाची निर्माती क्रिती सेननने केली आहे.

Kriti Sanon
Sarfarosh Film : ‘सरफरोश’ला २५ वर्षे पूर्ण, रियुनियन पार्टीचं आयोजन; टीमला भेटून सुकन्या मोने भारावल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com