Crew 10th Day Collection: करीना-क्रिती-तब्बूच्या 'क्रू'ने पार केला १०० कोटींचा टप्पा, दुसऱ्या विकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर चित्रपट सुसाट

Crew Box Office Collection: सध्या करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या अभिनयाचे फक्त भारतातच नाही तर, जगभरामध्ये जोरदार कौतुक होत आहे. चित्रपटाने १० दिवसांतच जगभरामध्ये १०० कोटींचा टप्पा गाठला आहे.
Crew 10th Day Box Office Collection
Crew 10th Day Box Office CollectionInstagram

Crew 10th Day Box Office Collection

सध्या करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या अभिनयाचे फक्त भारतातच नाही तर, जगभरामध्ये जोरदार कौतुक होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये रिलीज झालेल्या ‘क्रू’ चित्रपटाचे सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. चित्रपटाने जेमतेम १० दिवसांतच जगभरामध्ये १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केल्याने सर्वत्र सर्वांचे लक्ष वेधले. जाणून घेऊया, चित्रपटाच्या दुसऱ्या विकेंडमधील कमाईबद्दल... (Bollywood)

Crew 10th Day Box Office Collection
Allu Arjun Net Worth: प्रायव्हेट जेट अन् १०० कोटींचा बंगला; अल्लू अर्जुनची संपत्ती पाहून व्हाल आश्चर्यचकित

करीना कपूर खान, क्रिती सेनन, तब्बू ही तगडी स्टारकास्ट पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदाच या तिघीही अभिनेत्रींनी एकत्र स्क्रिन शेअर केलेली आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात देशभरामध्ये, ४५ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने ८२ कोटींची कमाई केलेली आहे. (Bollywood Film)

चित्रपटाने आठव्या दिवशी ३.७५ कोटी, शनिवारी ५.२५ कोटी आणि रविवारी म्हणजेच दुसऱ्या विकेंडला ५.७५ कोटींची कमाई केलेली आहे. आतापर्यंत देशभरामध्ये, ५८.५० कोटींची कमाई तर जगभरामध्ये चित्रपटाने १०४ कोटींची कमाई केलेली आहे. (Bollywood Actress)

'क्रू' चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे तर, एका दिवाळखोर विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन एअर होस्टेसची ही कथा आहे. तिघीही आपापल्या आयुष्यातील समस्यांमुळे चांगल्याच अडचणीत सापडलेल्या असतात. काम करूनही पगार मिळत नाही. त्यामुळे त्या तिघीही एक चुकीचं काम करतात, त्यावेळी कथेमध्ये एक वेगळाच ट्वीस्ट येतो. त्या तिघीही काय चुकीचं काम करतात?, ते काम केल्याने त्यांच्या अडचणीत कशी वाढ होते? हे सगळं चित्रपट पाहिल्यावरंच कळेल. (Bollywood News)

Crew 10th Day Box Office Collection
Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनला टॉलिवूडचा ‘मायकल जॅक्सन’ का म्हणतात?, जाणून घ्या सविस्तर

चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच हा चित्रपट देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी सोडत नाही. या चित्रपटाने मार्केटमध्ये आपली पकड धरून ठेवली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली होती. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त चित्रपटामध्ये, दिलजीत दोसांझ, कॉमेडियन कपिल शर्मा, सास्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा यांचाही समावेश आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे. (Entertainment News)

Crew 10th Day Box Office Collection
Fighter Vs Animal: ओटीटीवर Fighterने अ‍ॅनिमलला पिछाडलं; नेटफ्लिक्सवर चालली ऋतिकची जादू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com