Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनला टॉलिवूडचा ‘मायकल जॅक्सन’ का म्हणतात?, जाणून घ्या सविस्तर

Allu Arjun: “पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला” म्हणत दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. अल्लू अर्जुनला टॉलिवूडचा ‘मायकल जॅक्सन’ का म्हणतात?, जाणून घेऊया....
Allu Arjun Birthday
Allu Arjun BirthdayInstagram

Allu Arjun Birthday

“पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला” म्हणत दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. अभिनेत्याची जगभरात क्रेझ कायम आहे. आज अभिनेत्याचा ४२ वा वाढदिवस आहे. टॉलिवूड सह बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुनच्या अभिनयाचा डंका कायमच वाजतो. अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ रोजी चेन्नईमध्ये जन्म झाला. अल्लू अर्जुनचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीसोबत जोडलं गेलेलं आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त, त्याला टॉलिवूडचा ‘मायकल जॅक्सन’ का म्हणतात?, जाणून घेऊया.... (Tollywood)

Allu Arjun Birthday
Fighter Vs Animal: ओटीटीवर Fighterने अ‍ॅनिमलला पिछाडलं; नेटफ्लिक्सवर चालली ऋतिकची जादू

चेन्नईतल्या एका सर्व सामान्य कुटुंबातून अल्लू अर्जुनने आपल्या चाहत्यांना अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगैया एक होमियोपॅथिक डॉक्टर आणि स्वातंत्र्यसेनानी होते. (Allu Arjun)

अल्लू अर्जुनच्या आजोबांनी अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तर अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद तेलुगू सिनेसृष्टीतले प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. ‘गीता आर्ट्स’ नावाचे प्रोडक्शन हाऊस अल्लू अर्जुनच्या वडिलांचे होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी अभिनेत्याने ‘विजेता’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून कामाला सुरूवात केली. त्याचा पहिला चित्रपट १९८५ मध्ये रिलीज झालेला. (Films)

Allu Arjun Birthday
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा नथीचा नखरा पाहून नेटकरी म्हणाले 'नाकापेक्षा नथ जड', VIDEO होतोय व्हायरल

२००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘गंगोत्री’ चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटापासून अभिनेत्याचे सिनेकरियर सुरू झाले. २००४ मध्ये ‘आर्या’ चित्रपटातून अल्लू अर्जुनला विशेष ओळख मिळाली. या चित्रपटासाठी अभिनेत्याला ‘विशेष ज्युरी अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.

फिल्मी बॅकग्राऊंड असतानाही अल्लू अर्जुनने ॲनिमेशनचा कोर्स केला होता. अल्लू अर्जुनने चित्रपटात काम करण्यापूर्वी काही दिवस ॲनिमेटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काही दिवस काम केले होते. या कामाचा मोबदला म्हणून अभिनेत्याला प्रत्येक महिन्याला ३५०० रुपये इतका पगार मिळायचा.

अभिनयासोबतच अल्लू अर्जुनला गाण्याची आणि डान्सचीही आवड आहे. ‘आला वैकुंठपुरामुल्लू’ चित्रपटातील त्याच्या सिग्नेचर स्टेपमुळे अल्लू अर्जुनला टॉलिवूडचा ‘मायकल जॅक्सन’ म्हटलं जातं. (Bollywood News)

Allu Arjun Birthday
Akshay Kumar: ट्विंकल खन्ना भेटण्याआधी 'खिलाडी कुमार'चं अनेक वेळा तुटलंय हृदय, स्वत:ला असं सावरलं...

२०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातून अल्लू अर्जुनला जगभरातून प्रसिद्धी मिळाली. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशीच निर्माते या चित्रपटाचा टीझर रिलीज करतील. गेल्या वर्षी अभिनेत्याच्या वाढदिवशीच चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झालेला. आता २०२४ मध्ये चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाबद्दल चाहत्यांन प्रचंड उत्सुकता आहे. (Entertainment News)

Allu Arjun Birthday
Akshay Kumar: ट्विंकल खन्ना भेटण्याआधी 'खिलाडी कुमार'चं अनेक वेळा तुटलंय हृदय, स्वत:ला असं सावरलं...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com