Case Registered Against Allu Arjun : मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण?

Allu Arjun : शनिवारी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case Registered Against Allu Arjun
Case Registered Against Allu ArjunInstagram

टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते कायमच उत्सुक होत असतात. सध्या अल्लू अर्जुन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शनिवारी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लूचा जवळचा मित्र आणि वायएसआरसीपी आमदार रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या प्रचारासाठी नंद्याल तो गेला होता. त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. अभिनेता अल्लू अर्जुनवर भादवि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case Registered Against Allu Arjun
Somy Apologise On His Behalf From Bishnoi : सलमानच्या एक्स-गर्लफ्रेंडचे सूर बदलले, बिश्नोई समाजाची माफी मागत म्हणाली...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अल्लू अर्जुन आणि रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या टीमने पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे अल्लू अर्जुन आणि रविचंद्र रेड्डी यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा सुद्धा त्याच्यासोबत प्रचारासाठी हजर होती.

Case Registered Against Allu Arjun
प्रसिद्ध अभिनेत्याची कोट्यवधींची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये परताव्याच्या नावाखाली लुटलं

काल (शनिवार) चौथ्या टप्प्याच्या निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या. यावेळी टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुन YSRCP चे आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी उर्फ शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या प्रचारासाठी गेला होता. यावेळी अभिनेत्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना पाठिंबा दिला.

आता अल्लू अर्जुन येणारही बातमी चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी YSRCP च्या आमदारांच्या घराबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. यावेळी अल्लू अर्जुनने YSRCP च्या आमदारांच्या घराच्या बाल्कणीतून एक झलक दाखवली.

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी आणि अल्लू अर्जुन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्पा रवि चंद्रा यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होईल हे जाणून आरओ नंद्याल यांच्या परवानगीशिवाय अल्लू अर्जुनला घरी बोलावले, असे तक्रारीत म्हटले आहे.

Case Registered Against Allu Arjun
Kriti Sanon : "हिट चित्रपट न देणाऱ्या पुरुष कलाकारांनाही फी जास्त..."; क्रिती सेनन बॉलिवूड निर्मात्यांवर संतापली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com