ambati rayudu
ambati rayudugoogle

Ambati Rayudu: अवघ्या ९ दिवसात अंबाती रायुडूचा राजकारणाला रामराम! धक्कादायक निर्णय घेण्यामागचं कारण काय?

Ambati Rayudu Leaves Politics: भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने राजकारणाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे
Published on

Ambati Rayudu Politics:

भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने राजकारणाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.रायुडूने युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मुख्य बाब म्हणजे त्याने ९ दिवसांपूर्वीच म्हणजे २९ डिसेंबर रोजी या पार्टीत प्रवेश केला होता. मात्र राजकिय सुरु होण्याच्या आधीच संपली आहे. त्याने काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अंबाती रायुडूने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहीले की,'मी YSRCP पार्टी सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दुर राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्वांना सुचित करण्यासाठी आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल.'

९ दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश..

अंबाती रायुडूने २८ डिसेंबर रोजी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या पार्टीत प्रवेश केला होता. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि सांसद पेड्डीरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील उपस्थित होते. रायडूने तात्पुरता राजकारणातून ब्रेक घेतला आहे. मात्र तो राजकारणाला कायमचा रामराम ठोकणार की पुन्हा त्याच उत्साहात कमबॅक करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये अला उल्लेख केला आहे की, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. (Latest sports updates)

ambati rayudu
T20 World Cup 2024: न्यूयॉर्कमध्ये रंगणार IND vs PAK सामन्याचा थरार! तारीख आताच नोट करुन ठेवा

आयपीएल २०२३ स्पर्धा ही त्याची शेवटची आयपीएल स्पर्धा ठरली. या स्पर्धेचा अंतिम सामन्यानंतर त्याने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. या हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलला रामराम करण्यापूर्वी अंबाती रायुडूने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याला ५५ वनडे, ६ टी-२० आणि आयपीएल स्पर्धेत २०३ सामने खेळण्याची संधी मिळाली.

ambati rayudu
IND vs SA 2nd Test: मन जिंकलस भावा! सिराज कौतुक करत असताना बुमराहने जे केलं ते पाहुन अभिमानच वाटेल; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com