Ambati Rayudu: CSK ला चॅम्पियन बनवणारा शिलेदार करणार राजकारणात प्रवेश; या पक्षाकडून लढवणार निवडणूक

Ambati Rayudu Entry In Politics: क्रिकेटचे मैदान गाजवलेला हा खेळाडू आता राजकारणाच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करताना दिसुन येणार आहे.
ajinkya rahane
ajinkya rahanesaam tv
Published On

Ambati Rayudu Enters Into Politics: भारतीय संघाचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने काही दिवसांपूर्वी आयपीएल स्पर्धेला राम राम केला होता. आता लवकरच तो आपल्या नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे.

रायुडूने राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवलेला हा खेळाडू आता राजकारणाच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करताना दिसुन येणार आहे.

ajinkya rahane
Team India News: वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज! या मालिकेतून Jasprit Bumrah अन् KL Rahul चे होणार कमबॅक

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रायुडूने पैतृक जिल्ह्यात असलेल्या गुंटूरचा दौरा केला. त्यावेळी त्याने एका स्थानिक रिपोर्टरसोबत बोलताना म्हटले की, 'आंध्र प्रदेशातील जनतेची सेवा करण्यासाठी मी लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन लोकांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रायुडूच्या म्हणण्यानुसार, तो ठिकठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे. त्यांना काय समस्या आहेत हे जाणून घेणार आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मी एक ठोस निर्णय आणि कार्यपद्धती घेऊन राजकारणात प्रवेश करेल.' माजी भारतीय क्रिकेटपटूने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुंटूर किंवा मछलीपट्टणममधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. (Latest sports updates)

ajinkya rahane
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

अंबाती रायुडू कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये. मात्र असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतो. त्याने १९ एप्रिल रोजी ट्विट करून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'उत्तम भाषण.. आमचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी.. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com