ICC ODI WC 2023 Schedule India vs Pakistan Match Date: ज्या क्षणाची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसीने) आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्युझिलंड या दोन्ही संंघांमध्ये रंगणार आहे. तर अंतिम सामना अहमदाबादच्या मैदानावर रंगणार आहे.
तर १५ ऑक्टोबर रोजी भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.
या स्पर्धेतील सामने हैदराबाद, धर्मशाळा, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद .या ठिकाणी रंगणार आहेत.
असे आहेत भारतीय संघाचे सामने..
८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू (ICC ODI WC 2023 Time Table)
भारत - पाकिस्तान सामना.. (India VS Pak Match Date)
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. यावेळी भारतात सामना रंगणार आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय संघाचं पारडं जड असणार आहे. (Latest sports updates)
१० संघांमध्ये रंगणार ४८ सामने..
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत १० संघ आमने सामने येणार आहेत. ज्यात भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश,इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आणि दक्षिण आफ्रिका हे संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. तर वर्ल्ड कप पात्रता फेरीतील टॉप २ मध्ये असणारे संघ थेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत प्रवेश करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.