IND vs WI: भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळताना दिसून येणार आहे. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघातून चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादवला संघाबाहेर करण्यात आलं आहे.
संघाची घोषणा झाल्यानंतर अशा चर्चा सुरु होत्या की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील कामगिरी पाहता, उमेश यादवला संघाबाहेर केलं गेलं आहे, मात्र आता उमेश यादवच्या खेळण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उमेश यादवला संघाबाहेर केलं गेलं नाही. तर तो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला विश्रांती दिली गेली आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, 'उमेश हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे तो नॅशनल क्रिकेटमध्ये असुन तो दुखापतीतुन सावरण्याच्या प्रयत्नात आहे.' सुत्राच्या माहितीनुसार उमेश यादव कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. यापुर्वी अजिंक्य रहाणेला देखील संघाबाहेर केलं गेलं होतं. मात्र त्याने आता संघात कमबॅक केलं असुन त्याला संघाचे उपकर्णधारपद दिले गेले आहे. (Latest sports updates)
आयपीएल २०२३ स्पर्धेत रिंकू सिंगची दमदार कामगिरी..
तर आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिंकू सिंगची देखील लॉटरी लागु शकते. या हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना दमदार कामगिरी केली होती.
या कामगिरीची दखल घेत त्याला वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. त्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १४ सामन्यांमध्ये १५० च्या स्ट्राईक रेटने ४७४ धावा केल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.