Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, हल्ल्यात जगनमोहन रेड्डी जखमी

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे. विजयवाडा येथे मेमंथा सिद्धम बस यात्रादरम्यान जगनमोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, हल्ल्यात जगनमोहन रेड्डी जखमी
Jagan Mohan ReddySaam Tv
Published On

Jagan Mohan Reddy:

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे. विजयवाडा येथे मेमंथा सिद्धम बस यात्रादरम्यान जगनमोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक करण्यात आली. ते लोकांचं अभिवादन स्वीकारत असताना हा हल्ला झाला. यावेळी जगनमोहन रेड्डी यांच्या डाव्या भुवयाला दगड लागल्याने दुखापत झाली.

यावेळी रेड्डी यांच्या शेजारी उभे असलेले आमदार वेलमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला देखील दुखापत झाली. बसमधील जगनमोहन रेड्डी यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर जगनमोहन रेड्डीन यांनी त्यांची बस यात्रा सुरू ठेवली आहे.

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, हल्ल्यात जगनमोहन रेड्डी जखमी
Maharashtra Politics: पवारांचा डाव, भाजपला घाव! 3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?

मिळालेल्या माहितीनुसार, जगनमोहन रेड्डीन शनिवारी विजयवाडा येथील सिंहनगरमध्ये रोड शो करत होते. यावेळी ते लोकांचं अभिवादन स्वीकारत होते. यानंतर त्यांची बस विवेकानंद स्कूल सेंटर येथे असताना रेड्डी यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

यावेळी त्यांच्या डाव्या भुवयाला दगड लागल्याने दुखापत झाली. त्यांना दुखापत झाल्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर त्यांना बसमध्ये तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांनी पुन्हा लोकांना अभिवादन करत आपली यात्रा सुरू ठेवली.

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, हल्ल्यात जगनमोहन रेड्डी जखमी
Sindhudurg Lok Sabha: ...म्हणून आम्हाला ती जागा हवी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर उदय सामंत यांनी पुन्हा केला दावा

दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये 25 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, जे चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी होणार आहे. ज्यामध्ये अराकू, श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ले, काकीनाडा, अमलापुरम, राजमुंद्री, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टणम, विजयवाडा, गुंटूर, नरसरावपेट, बापटला, ओंगोल, नंदयाल, कुरनूल, अनंतपूर, हिंदूपूर, कडपाह, नेल्लोर, तिरुपती (राखीव), राजमपेट आणि चित्तूर या जागांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com