Maharashtra Politics: पवारांचा डाव, भाजपला घाव! 3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?

Madha Lok Sabha : रविवारी राज्यातील 3 बडे नेते एकत्र येणार आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे अकलुजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत.
पवारांचा डाव, भाजपला घाव!  3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?
Sharad Pawar, Sushilkumar Shinde, Vijaysinh Mohite–patil Saam Tv
Published On

Lok Sabha Election 2024:

रविवारी राज्यातील 3 बडे नेते एकत्र येणार आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे अकलुजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी साम टीव्हीला ही माहिती दिलीये. रविवारी धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर येत्या 16 एप्रिलला पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या भेटीनंतर माढ्यासह बारामती, सोलापुरचं राजकीय समीकरण कसं असेल याचा हेच समजून घेऊ...

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्याआधी शरद पवारांसह सुशीलकुमार शिंदे हे अकलूज इथल्या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी येणार आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन मातब्बर नेते एकाच छताखाली येणार असल्यामुळे सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय.

पवारांचा डाव, भाजपला घाव!  3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?
Sindhudurg Lok Sabha: ...म्हणून आम्हाला ती जागा हवी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर उदय सामंत यांनी पुन्हा केला दावा

माढ्यासाठी पवार-मोहितेंचा सलोखा..

मिळालेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठविण्यासाठी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघ सोडून स्वत:साठी दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केली होती. यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांनीच शरद पवारांना माढा मतदारसंघातून सुरक्षितपणे लोकसभेत पाठवलं होतं. आता भाजपने धैर्यशील पाटलांना उमेदवारी नाकारल्यामुळे मोहिते पाटील घराणं नाराज आहेत. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांच्या मदतीची परतफेड करण्याची संधी शरद पवारांकडे आहे.

याआधी म्हणजेच 2019 च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणामुळे मोहिते पाटलांनी शरद पवारांपासून फारकत घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पवार-मोहितेंचा सलोखा वाढल्यामुळे भाजपची अडचण वाढलीय. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदेंही सोबत आल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदलणार आहे.

पवारांचा डाव, भाजपला घाव!  3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?
Rahul Gandhi: देशाच्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटनात येऊ दिलं नाही, कारण त्या आदिवासी आहे; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

प्रणिती शिंदेंचा विजय सुकर होणार?

सोलापूर दक्षिणच्या जागेवरून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदारकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर भाजपने आमदार राम सातपुते यांना सोलापूर दक्षिणची उमेदवारी दिलीय. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील कुटुंबाचं कायम एकछत्री वर्चस्व राहिलंय. यापूर्वी मोहिते-पाटील हे घराणं ज्याच्या पाठीशी उभं राहील, तोच इथला खासदार असं समीकरण प्रचलित होतं. म्हणूनच मोहिते पाटील घराण्याचा पाठिंबा मिळवून सोलापुरात प्रणिती शिंदेंचा विजय सुकर करण्याची सुशीलकुमार शिंदेंची रणनीती आहे. सध्याच्य घडीला जरी मोहिते-पाटलांच्या विरोधकांचं बळ वाढलं असलं. तरीही थेट मोहिते पाटलांविरोधात भूमिका घेणं भाजपच्याही फायद्याचं नाही.

खरं तर महायुतीच्या माध्यमातून भाजपनं पश्चिम महाराष्ट्रातील पवारांचं राजकारण संपुष्टात आणण्याची रणनिती आखलीय. मात्र आपणही तेल लावलेले मल्ल आहोत, हे पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. माढ्यात भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची लोकसभेची वाट बिकट होण्याची चिन्हं आहेत. शिवाय सोलापूर दक्षिणमध्ये राम सातपुतेंविरोधात तीन बडे नेते काय रणनीती आखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com