Sindhudurg Lok Sabha: ...म्हणून आम्हाला ती जागा हवी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर उदय सामंत यांनी पुन्हा केला दावा

Uday Samant: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजपने सिंधुदुर्गची जागा नारायण राणे यांच्यासाठी मागितली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Uday Samant On Sindhudurg Lok Sabha
Uday Samant On Sindhudurg Lok SabhaSaam TV

Uday Samant On Sindhudurg Lok Sabha:

>> भरत नागरे

सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा नारायण राणे यांच्यासाठी मागितली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेने मात्र ही जागा पूर्वीपासून आमची असून 2019 च्या निवडणुकीत या जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजय झाल्याने ही जागा आम्हालाच मिळावी, असं वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हिंगोलीमध्ये केलं आहे.

उदय सामंत म्हणाले आहेत की, ''सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे आणि भाजपने देखील दावा केला आहे. मागच्यावेळी शिवसेनेनं ती जागा लढली होती. धनुष्यबाणावर ती जागा लढून आम्ही जवळपास 1 लाख 75 हजारांनी जिंकलो होतो. ते खासदार जरी आमच्यासोबत आले नसले तरी धनुष्यबाण आमच्यासोबत आलं आहे. म्हणून शिवसेनेची ती सीट असावी, असा आमचा दावा आहे. आमचे नेते याबाबत निर्णय घेतील. येथून महायुतीचा उमेदवार पावणेदोन लाख मतांनी निवडून येईल.''

Uday Samant On Sindhudurg Lok Sabha
Rahul Gandhi: देशाच्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटनात येऊ दिलं नाही, कारण त्या आदिवासी आहे; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर झाला नसला तरी भाजपनेते आशिष शेलार राणेंसाठी मैदानात उतरले आहेत. आशिष शेलार सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेत आहेत. आशिष शेलार सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यात मॅरेथॉन बैठका घेत आहेत.

आशिष शेलार या प्रचार दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत की, ''लोकांमध्ये संभ्रम नाही. योग्य वेळी उमेदवार जाहीर केला जाईल आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.'' ते म्हणाले आहेत की, नारायण राणे आमचे नेते आहेत. त्यांचे भाजप मध्ये उच्च स्थान आहे. त्यांची कोणासोबत तुलना करू नये.

Uday Samant On Sindhudurg Lok Sabha
Bhavana Gawali: मी नाराज नाही, मात्र तिकीट न मिळाल्यामुळे मला खंत वाटली: भावना गवळी

दरम्यान, अद्यापही महायुतीत म्हणजेच भाजप आणि शिवसेनेत या जागेवरून चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच अद्याप महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी शिवसेना आणि भाजपकडून येथे प्रचार सुरू करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com