Pushpa 2 The Rule Teaser: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या 'पुष्पा 2'चा टीझर कसा असेल? समोर आले आपडेट

Allu Arjun Birthday: या चित्रपटाबाबतच एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदान्नाचा यांचे फर्स्ट लूक आऊट झाले आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Pushpa 2 Teaser
Pushpa 2 TeaserSaam Tv

Pushpa 2 The Rule Movie:

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arujn) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबतच एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदान्नाचा यांचे फर्स्ट लूक आऊट झाले आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी म्हणजे ८ एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहेत.

'पुष्पा द राइज' या चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिलाच भाग सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली. हा चित्रपट साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला. आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे 'पुष्पा 2 द रूल'ची. या चित्रपटाची अल्लू अर्जुनचे चाहते वाट पाहत आहेत.

8 एप्रिलला पॅन इंडियाचा स्टार आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. या खास दिवशी 'पुष्पा: द रुल'चे निर्माते चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करणार आहेत. चाहते चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पाच्या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन कसा दिसणार हे चाहत्यांना बघायचे आहे. अशामध्ये 123 तेलुगूच्या ताज्या रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे की, टीझरमध्ये अल्लू अर्जुन ॲक्शन सीक्वेन्समध्ये साडी नेसलेल्या अवतारात दिसणार आहे.

अल्लू अर्जुनचा हा लूक चित्रपटाच्या जातरा सीक्वेन्सचा एक भाग असेल. जातरा सिक्वेन्स हे या चित्रपटाचे खास आकर्षण असल्याचे बोलले जात आहे. 'पुष्पा 2' चित्रपटातील अल्लू अर्जुनचे पोस्टर रिलीज झाले होते. त्यामध्येही तो साडीत दिसला होता. 'पुष्पा 2'चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. अल्लू अर्जुनला पहिल्या भागासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अशा परिस्थितीत सुकुमार दुसऱ्या भागात कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. या चित्रपटाबाबत आधीच प्रचंड हाईप निर्माण झाला आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Pushpa 2 Teaser
Shivali Parab: तिच्या इश्काच्या नादात, वाढेल तुमची ही Heartbeat…, शिवाली परबचं गाणं येतंय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com