Shivali Parab: तिच्या इश्काच्या नादात, वाढेल तुमची ही Heartbeat…, शिवाली परबचं गाणं येतंय

Heartbeat Vadhnar Hay Song: 'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांना हासवणारी शिवाली परब आता एका नव्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Heartbeat Vadhnar Hay Song
Heartbeat Vadhnar Hay SongSaam Tv

Shivali Parab New Song:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम शिवाली परब (Shivali Parab) आपल्या दमदार विनोदीशैलीने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. 'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांना हासवणारी शिवाली परब आता एका नव्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'Heartbeat वाढणार हाय' हे शिवालीचं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवाली परबने आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. शिवाली फक्त हास्यजत्रेत काम करत नाही तर तिने मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. शिवाली परब वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. 'म्याड केलंस तू' आणि 'मासोळी ठुमकेवाली' या गाण्यानंतर आता शिवाली परबचं नवं कोरं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यातून शिवालीचा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

शिवाली परबने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याच्या टीझर रिलीज झाल्यासंदर्भात पोस्ट केली आहे. शिवाली परबने या गाण्याचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चोरलया तिने Heart माझं, कस सांगू किती आहे ती Sweet. तिच्या इश्काच्या नादात, वाढेल तुमची ही Heartbeat…' या पोस्टद्वारे शिवालीने 'Heartbeat वाढणार हाय' या गाण्याचा टीझर रिलीज झाल्याची माहिती दिली. शिवाली परबच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

शिवाली परबसोबत या गाण्यामध्ये विशाल राठोड दिसणार आहे. या दोघांनी याआधी 'म्याड केलंस तू' या गाण्यात देखील सोबत काम केले आहे. हे गाणं शैलेश राठोडने गायलं आहे. या गाण्याच्या माध्यामातून शिवाली परब चाहत्यांचे हार्टबीट वाढवणार हे नक्की. शिवालीच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या एका चाहत्याने लिहिले की, 'HeartBeat तर नक्की वाढणारं...' दुसऱ्या चाहत्याने कमेंट्स करत लिहिले की, 'उन्हात बसून बसून वाट बघतोय, की होईल तुझी एक Meet, खूप उशीर झालंय अ गं वाढू लागलीय माझी Heartbeat' तर शिवालीच्या इतर चाहत्यांनी तिला या गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Heartbeat Vadhnar Hay Song
Jeetendra Kapoor Birthday: जितेंद्र यांचे खरं नाव आहे वेगळंच, अभिनेत्याचे हेमा मालिनी यांच्यासोबत होणार होते लग्न पण...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com