Somy Apologise On His Behalf From Bishnoi : सलमानच्या एक्स-गर्लफ्रेंडचे सूर बदलले, बिश्नोई समाजाची माफी मागत म्हणाली...

Somy Ali News : सोमी अलीने सलमान खानच्या वतीने बिष्णोई समाजाची माफी मागितली असून त्याला माफ करण्याची तिने विनंती केली आहे.
Salman Khan Ex Girlfriend Somy Apologise On His Behalf From Bishnoi
Salman Khan Ex Girlfriend Somy Apologise On His Behalf From BishnoiSaam Tv

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचे अचानक सुर बदलले आहेत. कालपर्यंत अभिनेता सलमान खानवर सतत वेगवेगळे आरोप करणाऱ्या सोमी अलीने आता अभिनेत्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

१४ एप्रिलला सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार आणि जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमक्यांमुळे सोमीला आता सलमान खानच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. तपासादरम्यान सोमीने सलमान खानच्या वतीने बिष्णोई समाजाची माफी मागितली असून त्याला माफ करण्याची तिने विनंती केली आहे.

Salman Khan Ex Girlfriend Somy Apologise On His Behalf From Bishnoi
प्रसिद्ध अभिनेत्याची कोट्यवधींची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये परताव्याच्या नावाखाली लुटलं

गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत ५ आरोपींना अटक केलेली आहे. या प्रकरणात विक्की चौधरी, सागर पाल, सोनू चंदर, अनुज थापन आणि मोहम्मद चौधरी अशा पाच आरोपींना अटक केलेले आहे. त्यासोबतच लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईलाही याप्रकरणी आरोपी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर मोक्का लावला असून अनमोलला पकडण्यासाठी लुकआऊट नोटीसही जारी केले आहे.

सोमी अलीने ९०च्या काळात बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. सध्या ती लाईमलाईटपासून दूर आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. मुलाखतीमध्ये ती म्हणाली, "सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी वयाच्या २४ व्या वर्षी अमेरिकेत आले. पण सध्या सलमान ज्या घटनांना तोंड देतोय, तशा घटना माझ्या शत्रूंच्याही वाट्याला येऊ नये. मला माहित आहे, ज्या परिस्थितीतून सलमान जातोय तशा परिस्थितीला कोणीही तोंड देणार नाही."

Salman Khan Ex Girlfriend Somy Apologise On His Behalf From Bishnoi
Kriti Sanon : "हिट चित्रपट न देणाऱ्या पुरुष कलाकारांनाही फी जास्त..."; क्रिती सेनन बॉलिवूड निर्मात्यांवर संतापली

"माझ्या प्रार्थना सदैव सलमानच्या पाठीशी आहेत. काय घडले आहे हे, महत्त्वाचे नाही, जे झाले तं जाऊ द्या. कोणासोबत घडावं असं मला केव्हाच वाटत नाही, मग तो सलमान असो, शाहरुख असो किंवा माझा शेजारी... मला सलमान किंवा त्याच्या कुटुंबाला कधीही त्रास होऊ नये असे वाटते."असं अभिनेत्री आपल्या मुलाखतीमध्ये म्हणाली.

Salman Khan Ex Girlfriend Somy Apologise On His Behalf From Bishnoi
Srikanth Film : श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना भावला, राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com