Jitendra Awhad: सलमान खानसारखं प्रकरण करू..., जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी

Bishnoi Gang Threat Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना लॉरेन्स बिष्णोई गँगने धमकी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांना फोन करून बिष्णोई गँगने धमकी दिली आणि २ लाख रुपयांची मागणी केली आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSaam Digital

विकास काटे, ठाणे

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर बिष्णोई गँगकडून (bishnoi gang) गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आता एका राजकीय नेत्याला बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना लॉरेन्स बिष्णोई गँगने धमकी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांना फोन करून बिष्णोई गँगने धमकी दिली आणि २ लाख रुपयांची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही तासांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला होता. फोन करत 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर सलमान खानसारखं प्रकरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. रोहित गोडारा नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता. ऑस्ट्रेलियावरून फोन केला असल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन जरी आला असला तरी जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

Jitendra Awhad
NCP Manifesto : 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी', राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; नेमकी काय दिली आश्वासनं?

१४ एप्रिल रोजी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर बिष्णोई गँगकडून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आदेशावर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी गुजरात आणि हरियाणातून अटक केली होती. हा गोळीबार फक्त सलमान खानला घाबरवण्यासाठी होते. त्याला कोणतीही इजा पोहचवायची नव्हती, असे आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले होते.

Jitendra Awhad
Pune Crime News: पुण्यात पुन्हा 'मुळशी पॅटर्न'; भरचौकात तरुणावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी पिस्तूल गुजरातमधील तापी नदीमध्ये फेकून दिले होते. चौकशीदरम्यान आरोपींनी ही माहिती दिली होती. आता मुंबई पोलिस आरोपींना घेऊन गुजरातला गेले आहेत. दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिस अधिकारी जेव्हा सलमानच्या घरी पोहोचले तेव्हा अभिनेत्याने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.

Jitendra Awhad
Mumbai News : गार्डनमध्ये खेळताना विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू; मुंबईच्या गोरेगावमधील दुर्दैवी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com