Malayalam Actor Hari Murali
Malayalam Actor Hari Murali

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

Actor Hari Murali Found Dead : मल्याळम चित्रपटसृष्टीतील तरुण अभिनेता हरी मुरली यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन झाले. केरळमधील त्यांच्या राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले.
Published on

Malayalam Actor Hari Murali, 27, Found Dead At His Residence : प्रसिद्ध मल्याळम अभिनेते हरी मुरली यांचं २७ व्या वर्षी निधन झालेय. राहत्या घरी हरी मुरली यांचा मृतदेह आढळल्याचे वृत्त मनोरमाने दिले. हरी यांच्या निधनाच्या दुःखद बातमीने मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हरी मुरली यांनी मल्याळम चित्रपटात बाल कलाकार म्हणून सुरूवात केली होती. रसिकन, अन्नन थंबी, पट्टनाथिल भूतम आणि उल्कम सुमंतावलिभान यासारख्या अनेक चित्रपटात हरी मुरली यांनी भूमिका केल्या आहेत. (Malayalam actor Hari Murali found dead at home)

मनोरमा ऑनलाइनच्या वृत्तानुसार , अभिनेते हरी मुरली यांचं २७ वर्षी निधन झाले. केरळमधील पय्यानूर जिल्ह्यातील अन्नूर येथील घरी ते मृतावस्थेत आढळले. त्यांचे पार्थिव एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. त्यांना हॉर्ट अॅटकचा झटका आला असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. फक्त २७ व्या वर्षी मुरली यांचं निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Malayalam Actor Hari Murali
टेन्शन संपलं! ३२ देशांनी खजिना उघडला, तब्बल ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात

२००४ मध्ये दिलीपच्या रसिकन या चित्रपटातून मुरली यांनी बाल कलाकार म्हणून मल्याळम चित्रपटश्रृष्टीत पदार्पण केले होते. हरी मुरली यांनी अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली होती. चेहऱ्यावरील निरागसता आणि डॉयलॉगमुळे त्यांनी संपूर्ण केरळचे लक्ष वेधून घेतले होते. चाहते हरी मुरली यांना प्रेमाने उन्निकुट्टन म्हणत होते. रसिकन या चित्रपटामुळे मुरली एका रात्रीत प्रसिद्ध झाले होते.

Malayalam Actor Hari Murali
जयशंकर यांचा एक फोन अन् भारताचं गॅसचं टेन्शन मिटलं; इराणने घेतला सर्वात मोठा निर्णय

रसिकन चित्रपटाला भरघोस यश मिळाल्यानंतर मुरली यांनी एकापाठोपाठ एक मल्याळम चित्रपटात काम केले. त्यांनी २७ वर्षांपर्यंत १५ चित्रपटात भूमिकाकेली. अन्नन थंबी, पट्टनाथिल भूतम, उल्कम सुमंतावलिभान यासारख्या चित्रपटात त्यांनी दर्जेदार अभिनय केला. खासगी कारणांसाठी त्यांनी चित्रपटातून ब्रेक घेतला होता. पण त्यानंतर पुन्हा त्यांनी कमबॅक केले. अमर अकबर अँथनी या चित्रपटात अभिनेता पृथ्वीराजच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती.

Malayalam Actor Hari Murali
LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com