टेन्शन संपलं! ३२ देशांनी खजिना उघडला, तब्बल ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात

global oil supply crisis : जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या ३२ सदस्य देशांनी आपत्कालीन साठ्यातून ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

IEA decision to release 400 million barrels of oil reserves : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील अनेका देशांना इंधन आणि गॅस तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. याचा थेट परिणाम भारतावरही पडलाय. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. त्याशिवाय गॅस भरण्यासाठीही ग्राहकांनी गर्दी केली आहे. देशातील अनेक हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू असतानाच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगभरातील इंधनाचा तुटवडा संपवण्यासाठी ३२ देशांनी पुढाकार घेत मोठा निर्णय घेतला आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे. संभाव्य पुरवठा संकट आणि किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने एक मोठे पाऊल उचललंय. एजन्सीच्या सर्व ३२ सदस्य देशांनी आपत्कालीन साठ्यातून ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात सोडण्यास सहमती दर्शविली आहे. IEAने एका निवेदनात म्हटले आहे की, धोरणात्मक तेल साठ्याचे हे प्रकाशन प्रत्येक सदस्य देशाच्या राष्ट्रीय परिस्थितीनुसार तयार केलेल्या कालावधीत केले जाईल. जागतिक बाजारपेठेत अतिरिक्त पुरवठा वाढवणे आणि संभाव्य पुरवठा संकटादरम्यान किमतीतील अस्थिरता कमी करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com