Indian tankers allowed to pass Hormuz strait safely : इराण-इस्रायल युद्धाचा भारताला मोठा फटका बसला होता. देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता, ज्यामुळे हॉटेल अन् व्यवसायावर गंभीर परिणाम झाला होता. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जयशंकर यांची राजकीय कूटनीती यशस्वी ठरली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे. पुढील काही तासांत ही जहाजे मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दाखल होतील. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यातील चर्चेनंतर हा तोडगा निघाला आहे.
इराणने भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यावर घातलेले निर्बंध हटवले आहेत. अमेरिका, युरोप आणि इस्रायलमधील जहाजांवर अजूनही निर्बंध कायम आहेत. या भागात हल्ल्यांचा धोका असतानाही हा निर्णय घेण्यात आला आहे. एस. जयशंकर आणि अब्बास अराघची यांच्यातील चर्चेनंतर लगेचच दोन भारतीय जहाजे रवाना झाल्याचे समजतेय. "पुष्पक" आणि "परिमल" ही दोन जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करताना दिसली आहेत. आखाती देशांत सुरू असलेल्या तणावामुळे अनेक देशांच्या जहाजांना गंभीर धोका असताना, भारताच्या दोन जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यात आला आहे. भारतासाठी ही दिलासादायक बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.
सौदी अरेबियातून कच्चे तेल वाहून नेणारा लायबेरियाचा ध्वज असलेला तेल टँकर 'शेनलाँग' सुरक्षितपणे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून मुंबई बंदरात पोहोचला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे शक्य झाले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती मागील ४ दिवसांत हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक जहाजे या ठिकाणी इराणकडून नष्ट केली जात आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला करून जहाजे बुडवली जात असल्याने जगावर ऊर्जा पुरवठ्याचे संकट ओढावले आहे. भारतातही याचे परिणाम जाणवत होते. आता जयशंकर यांच्या कूटनीतीला यश आले असून, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना भारतात येण्यास परवानगी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.