‘बिग बॉस मराठी २’ फेम उत्कर्ष शिंदे नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खासगी आयुष्यातील अपडेट्स शेअर करतो. उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे आणि खास लेखनशैलीने सर्वांच्या मनावर राज्य केलंय. नुकतंच उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीबद्दल खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे म्हणतो, “ “मराठीची समज, संवेदनशील अभिनेता, वक्ता, रोकठोक व्यक्तिमत्व... निसर्ग तुमच्या उत्कर्षासाठी आपोआप गोष्टी घडवतो अस माझं मत आहे. चार्ल्स डार्विनने ‘सक्षम ते जगतील’ “survival of fittest”अस सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले.माझ्या आयुषात ही असाच एक चार्ल्स डार्विन आहे.”
”गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती. ”द जितेंद्र जोशी” “मराठीची समज,संवेदनशील अभिनेता, नीडर वक्ता, रोकठोक व्यक्तिमत्व” आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती मग सेक्रेड गेम्स असो किंवा, नुकताच आलेला गोदावरी किंवा नाळ २ असो.मराठी सिनेविश्वाला नेहमी त्याच्या अभिनयातून गीतातून, कवितांमधून वेगळं काही तरी देणार अवलिया.”
“माझ्या साठी कलाविश्वात गुरु स्थानी असलेला कलाकार,व्यक्तीमत्व म्हणजे ”द जितेंद्र जोशी” “नेहमी भेटल्यावर मोठ्या भावाप्रमाणे आधी काळजीपोटी. माझ्या खांद्याच्या झालेल्या दुःखापतीची विचारपूस करणारा. नुसती विचारपूस नाही तर स्वतः शोल्डर मूवमेंट स्ट्रेंथट्रेनिंग करुन घेणारा. उत्कर्ष तू आता अभिनय क्षेत्रात आला आहेस. खूप काम कर कामात मज्जा-आनंद घे. जस चार्ल्स डार्विन सजीवान बदल सांगतात. जगण्याच्या ह्या स्पर्धेत जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते.” (Social Media)
“या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव तग-धरून राहतो. आणि तोच जीव टिकतो. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असेच जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. असाच काही मला नेहमी नकळत पणे गप्पा मारत मार्गदर्शन करणारा.मराठी सिनेमाची दिशा समजाऊन सांगणारा.कम्पटीशन स्ट्रगल हार्डवर्क बद्दल मार्गदर्शन करणारा.” (Entertainment News)
“प्रेक्षकांच्या आवडी निवडी बदल सतर्कता ठेव सांगणारा.अभिनय क्षेत्रात दिशा,कन्सिस्टन्सी (नियमितपणा), ह्याचं महत्व सांगत संस्कार करणारा. सुतार पक्ष्या च उदाहरण देत “लगे रेहनेका भाई बाकी सब होजाता है” म्हणजेच सगळं विसरून , कामात झोकून द्यायचा मग स्वतःची त्या झाडात सुंदर कुपी तयार होतेच. आकाशाला गवसणी घातलेला जमिनीवरचा माणूस,असा हा माझा गुरुस्थानी असलेला मोठा भाऊ .माझा चार्ल्स डार्विन “जितू दादा” (Marathi Film)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.