Shah Rukh Khan: देवा तुझ्या दारी आलो! वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान आता साईबाबा चरणी; VIDEO व्हायरल

Shah Rukh Khan At Shirdi: 'जवान' (Jawan Movie) आणि 'पठान' (Pathan Movie) चित्रपटांप्रमाणे 'डंकी' देखील सुपरहिट ठरावा यासाठी शाहरुख खानच्या सध्या देवांचे दर्शन घेण्यासाठी वाऱ्या सुरू आहेत.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanSaam Tv
Published On

Shah Rukh Khan Visit Shirdi Saibaba Temple:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटामुळे (Dunki Movie) चांगलाच चर्चेत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जवान' (Jawan Movie) आणि 'पठान'च्या (Pathan Movie) यशानंतर शाहरुख खान 'डंकी'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या दोन्ही चित्रपटांप्रमाणे 'डंकी' देखील सुपरहिट ठरावा यासाठी शाहरुख खानच्या सध्या देवांचे दर्शन घेण्यासाठी वाऱ्या सुरू आहेत. वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर आता शाहरुख खान शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी दाखल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूपच लकी ठरत आहे. या वर्षातला 'डंकी' हा शाहरुख खानचा तिसरा चित्रपट आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान सध्या देवांचे दर्शन करत चित्रपट सुपरहिट ठरावा आणि चांगली कमाई करावा यासाठी प्रार्थना करत आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख खानने वैष्णोदेवीचे दर्शन घेतलं. त्यानंतर आज तो साईबाबाच्या चरणी साकडं घालण्यासाठी पोहचला आहे. शिर्डी एअरपोर्टवर शाहरुख खान दाखल झाल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

Shah Rukh Khan
Tripti Dimri: रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरी विकी कौशलसोबत करणार रोमान्स, रोमँटिक फोटो व्हायरल

शाहरुख खान शिर्डीला येणार असल्याची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी एअरपोर्टबाहेर मोठी गर्दी केली होती. नवी मुंबईहून शाहरुख खान एका खासगी विमानाने शिर्डीमध्ये दाखल झाला. शिर्डी विमानतळाहून तो कारने साईबाबा मंदिराच्या दिशेने रवाना झाला. सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणाऱ्या साईबाबा समाधीचे तो थोड्याच वेळात दर्शन घेऊन पूजा करणार आहे.

Shah Rukh Khan
Animal Collection day 13: वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये 'अ‍ॅनिमल'ने मारली बाजी, ८०० कोटींचा आकडा पार करण्यासाठी इतके अंतर दूर

दरम्यान, 'डिंकी' चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला असून 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानशिवाय या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे बजेट 120 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 'डंकी' बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि प्रशांत नीलच्या 'सालार' चित्रपटाशी टक्कर देणार आहे. त्यामुळे हा चित्रपट देखील 'पठान' आणि 'जवान'प्रमाणे कमाई करेल की नाही हे रिलीज झाल्यानंतरच समजेल.

Shah Rukh Khan
Pooja Hegde: खरंच पूजा हेगडेला मिळाली जीवे मारण्याची धमकी?, समोर आलं खरं सत्य...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com