Shirdi : विखे पाटील गट गड राखणार? साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीसाठी थोरात- कोल्हे गटाची माेर्चेबांधणी

साई संस्थान कर्माचारी सोसायटीची खुप मोठी उलाढाल आहे.
sai baba sansthan karmchari society election vikhe vs thorat kolhe alliance
sai baba sansthan karmchari society election vikhe vs thorat kolhe alliancesaam tv

- सचिन बनसाेडे

Shirdi News :

कोट्यावधी रूपयांची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या‌ निवडणुकीचा (sai baba sansthan karmchari society election) बिगुल वाजला आहे. गेल्या वीस वर्षापासून विखे पाटील (radhakrishna vikhe patil) गटाची सत्ता असलेल्या सोसायटीत यावेळी परिवर्तन होणार? की विखे पाटील गट पुन्हा गड राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra News)

वार्षिक उलाढाल जवळपास दिडशे कोटी रूपये तसेच वार्षिक नफा 4 कोटी रुपयांपर्यंत आणि 75 कोटी रूपयांच्या ठेवी असलेल्या तसेच 1600 हून अधिक सभासद 200 कर्मचारी संख्येच्या शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 11 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.

sai baba sansthan karmchari society election vikhe vs thorat kolhe alliance
Shashikant Shinde : आमदार शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार ? जाणून घ्या प्रकरण

या कर्माचारी सोसायटीत गेल्या निवडणूकीत विखे पाटील (vikhe patil गटा विरोधात विठ्ठल पवार यांच्या गटाला 11 पैकी 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी विठ्ठल पवार यांच्या परीवर्तन विकास मंडळाला कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात (Congress Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (BJP Vivek Kolhe) यांचे पाठबळ मिळणार असल्याचं चित्र आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विखे पाटलांची सत्ता असलेल्या गणेशनगर सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवल्यानंतर थोरात - कोल्हे गटाने अनेक ग्रामपंचायतीत देखील विखेंना शह दिला. आता साईमंदिर कर्मचारी सोसायटीत देखील परीवर्तन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साई संस्थान कर्माचारी सोसायटीची खुप मोठी उलाढाल आहे. साई मंदिर परिसरातील प्रसाद, चहा कँटीन, मोबाइल लॉकर या सुविधा सेसायटीच्या मार्फत सशुल्क पुरवल्या जातात. तर कर्मचा-यांच्या मुदत ठेवी कर्ज प्रकरणे या सोसायटीच्या माध्यमातून होतात.

sai baba sansthan karmchari society election vikhe vs thorat kolhe alliance
Kolhapur: कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा संप; बस सेवा ठप्प

थोरात - कोल्हे पॅटर्नचा उदय होणार का ?

या सोसायटीच्या निवडणुकीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणूकीवर प्रभाव टाकणारा असल्याने पुन्हा एकदा विखे पाटील विरोधात थोरात - कोल्हे या दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. विखेंचा वरचष्मा असणा-या या संस्थेत आता थोरात - कोल्हे पॅटर्नचा उदय होणार का ? याकडे अवघ्या मतदारसंघाच लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

sai baba sansthan karmchari society election vikhe vs thorat kolhe alliance
Swabhimani Shetkari Sanghatana: जयंत पाटलांच्या कारखान्यावर धडकले स्वाभिमानीचे कार्यकर्ते, ऊस गाळपसाठीच्या गव्हाणीत मारल्या उड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com