National Film Awards 2023 Best Director: निखिल महाजनांच्या ‘गोदावरी’ला मिळाला न्याय, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

National Film Awards 2023: ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या श्रेणीमध्ये निखिल महाजन यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.
National Film Awards 2023 Best Director
National Film Awards 2023 Best DirectorInstagram
Published On

National Film Awards 2023 Best Director

भारतीय सिनेसृष्टीमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या नुकत्याच ‘६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ यांची घोषणा करण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये बॉलिवूड चित्रपटांसह, मराठी चित्रपटांनीही बाजी मारली आहे. नुकताच निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपटाला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या श्रेणीमध्ये निखिल महाजन यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.

चित्रपट गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

National Film Awards 2023 Best Director
National Film Awards 2023: ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सांगलीच्या पठ्ठ्याने मारली बाजी, सामाजिक विषयावरील डॉक्युमेंट्रीला स्पेशल ज्यूरी अवॉर्ड

दरम्यान चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, निशिकांत कुटुंबासोबत असलेला नात्यातील चढउतार, परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण 'गोदावरी' चित्रपटामध्ये मध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा 'गोदावरी' नदी भोवतीच फिरताना दिसत आहे. या नदीने सुख आणि दु: ख दोन्हीही अनुभवले असून नदीसोबतचे अनोखे नाते या चित्रपटातून उलगडणार आहे. 'गोदावरी' नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे गणित चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला समजते. (Marathi Film)

National Film Awards 2023 Best Director
69th National Film Award: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर; 'एकदा काय झालं' चित्रपटाने मारली बाजी

महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने भारतच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड 'कान्स' या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपटाचा समावेश होता. त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल (NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपली मोहोर उमटवली आहे. (Award)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com