६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची (69th National Film Award)घोषणा आज दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कारांमध्ये बॉलिवूडसह काही मराठी चित्रपटांनीही बाजी मारली आहे.
६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' म्हणून गौरवण्यात आले आहे. बाप- मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनीही भरघोस प्रेम दिले होते.
बापाच्या पावलावर पाऊल ठेवू पाहणाऱ्या एका मुलाची गोष्टी 'एकदा काय झालं' या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची कथा प्रत्येक बाप- मुलाला भावेल अशी आहे. बाबांसारखे बनण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या मुलाला बाबा परत कधीच येणार नाही ही गोष्ट कळते. यानंतर मात्र त्याच आयुष्य कसं होतं? बाबाने सांगितलेल्या गोष्टींचा खरा अर्थ त्याला त्यानंतर कळतो. यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
'एकदा काय झालं' या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याने मराठी चित्रपटसृष्टीचे नाव मोठे झाले आहे. चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री या कलाकारांनी काम केले आहे.
'एकदा काय झालं' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाची बाजी मारली आहे. तर अनेक मराठी चित्रपटांना पुरस्कार देण्यात आले आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे. 'गोदावरी' चित्रपटासाठी निखिल महाजनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून मराठमोळ्या 'पल्लवी जोशी'ला पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान, अभिनेत्रीला 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.