भारतीय सिनेसृष्टीमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या नुकत्याच ‘६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ यांची घोषणा करण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये बॉलिवूड चित्रपटांसह, मराठी चित्रपटांनीही बाजी मारली आहे. शेखर बापू रणखांबे या सांगलीच्या दिग्दर्शकाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित ‘रेखा’ या चित्रपटाला ‘सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी ॲवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी ‘रेखा’ या माहितीपटाच्या माध्यमातून उत्तम कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बऱ्याचदा रस्त्याशेजारील राहणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष करतो. कायमच त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत सर्वात आधी कामाला महत्व देत असतात. त्यांच्या आरोग्याची विचारपुस देखील कोणीही करत नाहीत. असा उत्तम विषय साताऱ्याच्या दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी ‘रेखा’ या माहितीपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच त्या महिलांच्या आयुष्यातील अडचणी मांडताना, महिलांच्या मासिक पाळी आरोग्याच्या वाईट स्थितीकडेही प्रेक्षकांचे लक्ष वेधतो.
“या विषयावर माहिती शोधत असताना, त्या महिला किती अस्वच्छ राहतात आणि त्या कशाप्रकारच्या गोष्टींचा सामना करत राहतात, हे कळलं.” अशी प्रतिक्रिया रणखांबे यांनी दिलीय. दरम्यान, चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, ‘रेखा’ या माहितीपटात रेखा ही महिला कशाप्रकारे राहते, हे आपल्याला कळते. तिच्या त्वचेला बुरशीजन्य संसर्गाने ग्रासलेले आहे. डॉक्टर तिला आंघोळ करून औषध लावायला सांगतात. पण तिचा नवरा तिला अडवतो आणि तिच्याशी दुर्व्यवहार करतो. रेखा आंघोळ करण्यासाठी प्रयत्न करते पण जेव्हा तिच्या समाजातील महिला तिला आंघोळ न करण्याचे कारण सांगतात तेव्हा तिला धक्काच बसतो. तिची द्विधा मनस्थिती होते. ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते जेणेकरून तिला संसर्गावर उपचार करण्यासाठी आंघोळ करता येईल. स्वच्छ राहण्यासाठी तिने केलेल्या संघर्षाचे कहाणी या माहितीपटामध्ये आहे.
दरम्यान, सातारचा दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ या माहितीपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता पर्यंत या माहितीपटाला इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्न, इफ्फी, बर्लिन, स्टुअटगार्ड सह अनेक मानाच्या पुरस्कारांमध्ये पुरस्कार पटकावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.