Naal 2 Trailer: 'नाळ भाग २'चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर रिलीज, चिमीची निरागसता प्रेक्षकांना आवडली

Naal 2 Trailer Out: 'नाळ भाग २'चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.
Naal 2 Trailer
Naal 2 TrailerSaam Tv

Naal 2 Movie:

'नाळ'च्या भरघोस यशानंतर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'नाळ २' (Naal 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी 'नाळ २'चा टीझर, त्यानंतर ‘भिंगोरी’ आणि ‘डराव डराव’ ही गाणी रिलीज करण्यात आली होती.

त्यानंतर आता 'नाळ भाग २'चा (Naal 2 Trailer) उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' चित्रपट दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'नाळ २' या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'नाळ' चित्रपटामध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का?, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला 'नाळ २'मध्ये पाहायला मिळणार आहेत. 'नाळ २'चा ट्रेलर उत्कंठा वाढवणारा आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून मिळणारी पसंती लक्षात घेता हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे दिसून येत आहे.

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात चित्रीकरण स्थळही एक व्यक्तिरेखा साकारत असते. याचा प्रत्यय आपल्याला 'नाळ २' चित्रपटाचा ट्रेलर पाहताना देखील येत आहे. ट्रेलरमध्ये ज्याप्रमाणे कलाकार इतक्या ताकदीचे दिसत आहेत. तितकेच चित्रीकरण स्थळही महत्वाची भूमिका बजावत आहे. नदी, दऱ्या, डोंगर, घरे असे निसर्गसौंदर्य चित्रपटात अतिशय सुरेखरित्या टिपण्यात आल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे चिमुकल्या गोंडस चिमीकडे. तिची निरागसता प्रेक्षकांना मोहणारी आहे. ज्याप्रमाणे 'नाळ'हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट होता. तसाच 'नाळ २' देखील असणार आहे.

Naal 2 Trailer
Elvish Yadav: 'बिग बॉस' विनर एल्विश यादववर अटकेची टांगती तलवार, नेमकं काय आहे प्रकरण?

दरम्यान, २०१८ मध्ये 'नाळ' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील चिमुकल्या चैत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाची नाळ प्रेक्षकांसोबत जोडली गेली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर नागराज मंजुळेने दुसरा भाग म्हणजेच नाळ २ प्रेक्षकांच्या भेटाला आणला आहे. या भागामध्ये चिमुकला चैतू मोठा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. चैतूच्या आयुष्यामध्ये झालेले बदल आणि यावेळी तो त्याच्या खऱ्या आईला कसा भेटतो हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून तो कधी रिलीज होतोय याची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागली आहे.

Naal 2 Trailer
Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' फेम पाठकबाईंचे कमबॅक; लवकरच नवीन चित्रपटात झळकणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com