Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' फेम पाठकबाईंचे कमबॅक; लवकरच नवीन चित्रपटात झळकणार

Akshaya Deodhar New Movie: अक्षया देवधर लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Akshaya Deodhar
Akshaya DeodharSaam Tv

Akshaya Deodhar And Sayali Sanjeev New Movie:

मराठी मालिकाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. अक्षया 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून सर्वांच्या भेटीला आली होती. अक्षया मध्यंतरी कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर नेहमी काही न काही शेअर करत असते.

अक्षया बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा 'पिल्लू बॅचलर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, अक्षयासोबत या चित्रपटात सायली संजीवदेखील दिसणार आहे. 'पिल्लू बॅचलर' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच समोर आले आहे.

चित्रपटाच्या नावावरुन ही लव्हस्टोरी असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दिग्दर्शक तानाजी घाडगे यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत 'हिरोंपेक्षा भाऊ आहेत किलर...कडक लाफ्टर घेऊन येतोय 'पिल्लू बॅचलर'' असे कॅप्शन दिले आहे. चित्रपट ८ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्षया खूप काळानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. त्यामुळे तिचे चाहते उत्सुक आहेत. चित्रपटात अक्षयासोबत पार्थ भालेराव, सायली संजीव, शंशाक शेंडे, डॉ. मोहन आगाशे हे कलाकार झळकणार आहेत.

Akshaya Deodhar
Rinku Rajguru: 'झिम्मा २' मधील रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वेचा लूक समोर, तुम्ही पाहिलात का?

अक्षयाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अक्षया तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचली. त्यानंतर खूप दिवसांनी चित्रपटातून एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सायली संजीव लवकरच 'झिम्मा २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshaya Deodhar
Bigg Boss 17: विकी-अंकिता बिग बॉसच्या घराबाहेर जाणार?, नव्या प्रोमोमुळे चाहते चिंतेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com