Elvish Yadav: 'बिग बॉस' विनर एल्विश यादववर अटकेची टांगती तलवार, नेमकं काय आहे प्रकरण?

FIR Against Elvish Yadav: याप्रकरणी नोएडा पोलिसांनी ५ जणांना अटक देखील केली असून ते एल्विश यादवचा शोध घेत आहेत.
Elvish Yadav
Elvish YadavSaam Tv
Published On

Bigg Boss OTT 2 Winner:

'बिग बॉस ओटीटी-२'चा विनर एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या अडचणीत आला आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. एल्विशवर विषारी सापांची तस्करी केल्याचा आणि बेकायदेशीरपणे रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप आहे.

भाजप खासदार मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेत काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक देखील केली आहे. आता याप्रकरणात एल्विशला देखील अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोएडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळालेला यूट्यूबर एल्विश यादववर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याच्या आरोपाखाली नोएडातील सेक्टर 49 पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेत काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सेक्टर 49 पोलिसांनी एल्विशनविरोधात गुन्हा दाखल केला.

एल्विशवर असा आरोप आहे की, तो नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडिओ शूट करायचा. याशिवाय रेव्ह पार्ट्यांमध्येही सापाच्या विषाचा वापर करत होता. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 9 विषारी साप आणि 20 मिमीचे सापाचे विष जप्त केले आहे. यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, दोन डोके असलेले साप आणि एका रेट स्नेकचा समावेश आहे. पोलिस एल्विश यादवचा शोध घेत आहेत.

Elvish Yadav
Kangana Ranaut: 'भगवान श्रीकृष्णाची कृपा असेल तर...', कंगना रनौतने दिले लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

नोएडा सेक्टर 49 पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावं आहेत. पीपल फॉर अॅनिमल्स या स्वयंसेवी संस्थेत कल्याण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, 'एल्विश यादव त्याच्या साथीदारांसह नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसवर बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असल्याची माहिती मिळाली होती. या पार्ट्यांमध्ये परदेशी मुलींना नियमित बोलावले जाते आणि ते सापाचे विष आणि इतर मादक पदार्थांचे सेवन करतात.'

Elvish Yadav
Tiger 3 New Promo: 'टायगर ३'चा नवा धमाकेदार प्रोमो रिलीज, इम्रान आणि सलमानमध्ये जुंपली; डायलॉग्जने जिंकलं चाहत्यांचं मन

'या माहितीवरून आमच्या एका माहितीदाराने एल्विश यादवशी संपर्क साधला आणि त्याला नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यास आणि कोब्रा वेनमची व्यवस्था करण्यास सांगितले. एल्विशने त्याच्या एजंट राहुलचा फोन नंबर दिला आणि तो तुमची सर्व व्यवस्था करेल असे सांगितले.' या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेत ५ जणांना अटक केली. आता पोलिस एल्विशचा शोध घेत आहेत.

Elvish Yadav
Elvish Yadav Video: सापांची तस्करी, रेव्ह पार्ट्या.... गंभीर आरोपांनंतर एल्विश यादवचा पहिलाच व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com