Uorfi Javed Arrested: खरंच उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केली का?, व्हायरल VIDEO मुळे अभिनेत्रीचे चाहते चिंतेत

Uorfi Javed Arrested By Mumbai Police: उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Uorfi Javed Arrested?
Uorfi Javed Arrested?Uorfi Javed Arrested? Video - Saam TV
Published On

Uorfi Javed Video:

आपल्या अतरंगी आणि हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडते. तिच्या कपड्यांची स्टाईल यामागचे सर्वात मोठे कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टवक्तेपणामुळे देखील ती चर्चेत राहते. या कारणामुळे अनेकदा उर्फीला ट्रोल देखील करण्यात आले आहे. तसंच तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या आहेत. असे असताना देखील उर्फी जावेद न घाबरता पुन्हा नव्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कॅमेऱ्यापुढे येत.

आता सध्या उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ (Uorfi Javed Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Uorfi Javed Arrested?
Telugu Film Industry मध्ये ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं, फक्त Allu Arjun चीच चर्चा, काय आहे कारण?

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. दोन महिला पोलिस तिला सोबत घेऊन जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल भियानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फी जावेदला खरंच अटक झाली आहे की नाही हे अद्याप समोर आले नाही. पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर उर्फीचे चाहते चिंतेत आले आहेत. पोलिसांनी तिला का अटक केले असा प्रश्न त्यांना पडला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद कॉफी शॉपमध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी या कॅफेच्या बाहेर पोलिसांची गाडी येते. दोन महिला पोलिस या कॉफी शॉपच्या बाहेर जाऊन उर्फीला बोलावतात. उर्फी पोलिसांकडे येते खरं पण पोलिस तिला आमच्यासोबत पोलिस ठाण्याला यावे लागेल असे सांगताना दिसतात. उर्फी पोलिसांना ताब्यात घेण्यामागचे कारण विचारत हुज्जत घालते.. तर पोलिस तिला म्हणतात इतके छोटे कपडे घालून कोण फिरते? त्यानंतर पोलिस उर्फीला गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जातात.

Uorfi Javed Arrested?
Salman Khan At The Kapil Sharma Show: लग्न केलंत तर बायको तुमचा.. सलमानने सांगितलं तरुणांना कानमंत्र

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्फीला पोलिसांनी का अटक केली असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे. तसंच तिचे चाहते देखील चिंतेत आले आहे. तर दुसरीकडे हा प्रमोशनल व्हिडीओ असल्याच्या कमेंट्स नेटिझन्स करत आहेत. काही नेटिझन्सनी असे म्हटले आहे की, 'हा एक प्रकारचा प्रमोशनल व्हिडीओ आहे. तो एक बझ तयार करण्यासाठी केला आहे. सत्य काय आहे ते भविष्यात कळेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com