Salman Khan At The Kapil Sharma Show: लग्न केलंत तर बायको तुमचा.. सलमानने सांगितलं तरुणांना कानमंत्र

Salman Khan and Kapil Sharma: कपिलने सलमानला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या मुलींबद्दल प्रश्न विचारले आहेत.
Salman Khan With Team Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Salman Khan With Team Kisi Ka Bhai Kisi Ki JaanSaam TV

Salman Khan With Team Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमान खान चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टसह कपिल शर्माच्या शोमध्ये प्रमोशनसाठी गेला होता, जिथे सर्वांनी खूप धमाल केली. सोनी टीव्ही वर याचे दोन प्रोमो शेअर करण्यात आले आहेत.

या प्रोमोमध्ये कपिलने सलमानला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या मुलींबद्दल प्रश्न विचारले आहेत. सामानानेही त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले, मुली येतात आणि मग आपण त्यांच्या अडकतो मग त्या निघून जातात.

प्रोमोच्या सुरुवातीला कपिल शर्मा सलमान खानला विचारतो. कपिल म्हणतो, 'तुला सगळे बोलतात भाऊ, तर सध्या तू जान बोलण्याचा अधिकार कोणाला दिला आहेस', यावर उत्तर देताना सलमान खान म्हणतो, 'किसी को हक नहीं देना जान बोलने का... जानपासून सुरुवात होते आणि मग जीव घेतात....

Salman Khan With Team Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Boys Arrested In Pune: पुणे विद्यापीठात रॅप साँग करणं पडलं महागात

तुझ्यासोबत राहून मी खूप आनंदी आहे, मी खूप भाग्यवान आहे, यात थोडा वेळ जातो, त्यानंतर आय लव्ह यू येते, आय लव्ह यू म्हणता, मग तुम्ही फसल्याचे तुम्हाला कळते, त्यानंतर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होते. जान हा अतिशय अपूर्ण शब्द आहे. मला वाटतं पूर्ण वाक्य असं आहे… जान मी तुझा जीव घाईन, त्यानंतर मी दुसर्‍याला जीव जान म्हणेन आणि त्याच्याही जीव घेईन.

सलमानची हे स्पष्टीकरण ऐकून कपिल, अर्चना पूरण सिंग आणि प्रेक्षक जोरजोरात हसू लागले. सलमानने त्याला त्याचा एकपात्री प्रयोग म्हटले आहे. सोनी वाहिनीने हा प्रोमो शेअर करत लिहिले आहे, सलमान खानने सांगितली प्रत्येक मुलाच्या मनातील कहाणी.

सलमान खान आणि आगामी चित्रपटाच्या टीमने कपिल शर्मा शोमध्ये छान आनंद लुटला. कपिलने पत्नी सुमोनाची चेष्टा करताच सलमान खान त्याला म्हणाला, कपिल शर्माने घरी जाऊन हे त्याच्या खऱ्या पत्नीला बोलून दाखवावे.

त्यानंतर डान्सर राघवने सलमान खानच्या चित्रपटासाठी ऑफर मिळाल्याबद्दल एक किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की, जेव्हा त्याला कोणीतरी सांगितले की सलमानचा कॉल आला आहे, तेव्हा त्याला वाटले की डान्सर सलमानने त्याला कॉल केला आहे. राघव म्हणाला त्याला येऊ दे. पण खरा सलमान खानचा फोन आल्याचे समजल्यावर तो आश्चर्यचकित झाला.

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, पलक तिवारी, शहनाज गिल आणि राघव यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com