Common Mistakes While Checking Blood Pressure at Home and How to Avoid Them
BP Measurement TipsGOOGLE

BP Measurement Tips: ब्लड प्रेशर घरी तपासण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्वाची माहिती

BP Monitoring: उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात. घरच्या घरी बीपी तपासताना योग्य बसण्याची पद्धत, कफचा आकार आणि काही महत्त्वाच्या गोष्टी टाळल्यास अचूक रीडिंग मिळू शकते.
Published on

सध्या ऊन प्रचंड वाढलेलं आहे. मुंबईतही उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये अनेक रुग्णांनी किंवा सगळ्यांनीच खूप पाणी पिणं गरजेचं आहे. या दिवसांमध्ये शरीराची फक्त बाहेरुनच नाही तर आतूनही काळजी घेणं महत्वाचं आहे. विशेषत: हार्टच्या रुग्णांनी या दिवसांमध्ये काळजी घेतली पाहिजे.

कारण यादिवसात थोडं चालूनही खूप घाम येतो, चालणं सोडाचं. पण घरी बसूनही खूप घाम येतो, चिडचिड अचानक वाढते आणि त्याचा परिणाम तुमच्या ह्रदयाच्या ठोक्यांवर होत असतो. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधांच्या वेळा, योग्य लाइफस्टाइल आणि रोजच्या- रोज BP तपासणं गरजेचं आहे. पुढे आपण ब्लड प्रेशर घरच्या घरी कसं तपासायचं जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल तर बातमी शेवट पर्यंत नक्की वाचा.

Common Mistakes While Checking Blood Pressure at Home and How to Avoid Them
Thursday Horoscope: आताच सावध व्हाल, वारेमाप खर्च होणार, काहींना अचानक भरपूर पैसा मिळणार, वाचा राशीभविष्य

BP तपासण्याची योग्य पद्धत कोणती?

उन्हाळ्यात सकाळीच खूप घाम येतो. त्यावेळेस अस्वस्थ वाटू शकतं. त्यामुळे ब्लड प्रेशर तपासल्यावर त्याचा आकडा बदलू शकतो. यामध्ये साधारण १० टक्क्यांपर्यंत तुम्हाला बदल पाहायला मिळेल. ह्रदयरोगतज्ज्ञ Dmitry Yaranov यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितलं की, रक्तदाब मोजताना सर्वात आधी बसण्याची एक पद्धत तुम्ही फॉलो केली पाहिजे. ती म्हणजे खुर्चीवर पाठ टेकवून सरळ बसून घ्या आणि दोन्ही पाय जमिनीवर सरळ ठेवा. पाय एकमेकांवर ठेवून बसू नका. हात टेबलावर ठेवून कोपर ह्रदयाच्या उंचीपर्यंत ठेवा. ही पद्धत योग्य असते. त्याने योग्य आकडा डॉक्टरांना मिळतो आणि त्यानुसार तुमच्यावर उपचार केले जातात. हे तुम्ही घरच्या घरी २ वेळेस सकाळी उठल्यावर आणि रात्री जेवणानंतर तपासला पाहीजे.

BP तपासताना कोणत्या चुका टाळाव्यात?

मुळात जेव्हा BP तपासता तेव्हा ५ मिनिटं एका जागी शांत बसलं पाहिजे. हालचाल करणं टाळलं पाहिजे. तसेच नाश्ता करुन किंवा खाऊन ब्लड प्रेशर तपासणं टाळा. कारण तो तेव्हा वाढलेला दिसेल. तसेच तुमचे हात खाली मोकळे ठेवू नका. इतरांशी किमान बोलू नका. शांत बसून ध्यान करु शकता. मोबाईलचा वापर तुम्ही अजिबात करु नका. डोकं शांत ठेवा. घरातल्या किंवा इतर समस्यांचा विचार करु नका.

Common Mistakes While Checking Blood Pressure at Home and How to Avoid Them
Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

लक्षात ठेवा!

रक्तदाब मोजण्यासाठी वापरत असलेल्या कफचा आकार हा योग्य असला पाहिजे. कफ हाताला घट्ट बसणारा असला पाहिजे. त्याचा फुगणारा भाग हाताच्या 80 टक्के भाग झाकणारा असणं गरजेचं आहे. कपड्यांवरून कफ बांधण्याऐवजी तो थेट त्वचेवर लावल्याने तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com