Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे हवामान बदलामुळे पावसाचे संकट उभं ठाकलंय. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ७२ तासांचा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्यानं यवतमाळ, चंद्रपूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

राज्यात एकीकडे उकाडा वाढला आहे. तापमानाचा पारा चढला असून उष्णता वाढली आहे. उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. विदर्भातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. दुपारी भरणारी शाळा सकाळी भरवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com