नाशिकच्या शिंदे पळसे टोलनाक्यावर हिरकणी बस पेटली
बस पेटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बसमधील प्रवासी सुरक्षित
शिरुर, पुणे
पुणे-आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव मंदिरासमोर ट्रॅव्हल बस पेटली
पुण्याहून शिरुरच्या दिशेने जात असताना बसला आग
प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवले
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा
पुण्यात पॅलेस्टाईनमधील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खामेनेई यांच्या समर्थकांनी केलं आंदोलन
आंदोलनात मुस्लिम समाजातील महिला, लहान मुले तसेच पुरुष मोठ्या संख्येने सहभागी
पुण्याजवळील वाघोलीत यंदा ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार 18 ते 22 मार्च या कालावधीत रंगणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुंबईत अनावरण करण्यात आले. मानाच्या गदेचे पूजन बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
गॅस टंचाई आणि दरवाढीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेकडून चूल पेटवत आंदोलन
सिलिंडरला लाकडं लावत चूल पेटवत गॅस दरवाढीचा केला निषेध
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि बॅनरबाजी
किल्ले रायगडाला चार दिवसांपूर्वी वणवा लागला होतो. रायगड किल्ल्याच्या दक्षिण भागातील डोंगर उतार आणि दरीत हा वणवा लागला होता. वणव्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत.
नाशिकच्या शिंदे पळसे टोलनाक्यावर हिरकणी बस पेटली आहे. या पेटलेल्या बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजित दादांच्या अपघात प्रकरणात विमान कंपनीवर लवकरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
पेन्शन मिळत नसल्याने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवून घेतले घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय.
गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ चिखली शहरात काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. महिलांसह कार्यकर्त्यांनी भाजप सरकार व गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गॅस दरवाढ तात्काळ रद्द करावी तसेच महागाईमुळे त्रस्त झालेल्या लाडक्या बहिणींना दिलासा द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली.
महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे काही काळ परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले.
संस्कृतीचे लेण जपणाऱ्या मनस्विनींसाठी तनिष्क ने "डोर" या दागिन्यांचे कलेक्शन गुढी पाडव्याचा निमित्ताने लाँच केले. मराठी अभिनेत्री प्रिया बापट यांच्या हस्ते हे लाँच आज पुण्यात संपन्न झाले. मंगळसूत्र, नथ, बांगड्या यासारखे विविध दागिने या "डोर" कलेक्शन मधून आज लाँच करण्यात आले. यावेळी मराठी संस्कृती आणि गुडी पाडवा या सणाचे महत्त्व प्रिया बापट यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसंच मराठी संस्कृती जपणे आणि महिलांचे शशिक्तीकरण हा उद्देश आजच्या नवीन कलेक्शन मधून अधोरेखित केला असल्याचं प्रिया बापट यांनी बोलताना सांगितलं. मी स्वतः सुद्धा प्रत्येक मराठी सण मोठ्या उत्साहात साजरा करते हे यावेळी प्रिया बापट यांनी आठवणीने सांगितलं.
परभणी जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाकडून शहरात धाडी टाकल्या जात आहेत.
काल पूर्णा शहरात ११ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केल्यानंतर आज परभणी शहरासह जिल्ह्यात भरारी पथकाने कारवाई केली. छोट्या हॉटेल मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने २० ठिकाणी छापे टाकले.या कारवाईत जवळपास ४६ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधितांवर कारवाई केली जात आहे ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिली आहे .
सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची घसरण..
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 255 रुपयांवर
चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपयांवर..
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी संघर्ष झाला परंतु महायुती खंबीर राहिल्यामुळे मी निवडून आले.जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य आणि प्रामुख्याने शेत रस्ते इत्यादी कामावर माझा भर राहील असं अर्चना पाटील म्हणाल्या.झालेल्या प्रक्रियेमध्ये 45 विरुद्ध 9 असे मतदान झाले त्यामुळे मी अध्यक्ष झाले मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी व्यक्त केल.
उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. यामुळे सुमारे 1700 एकरांवरील केळी पिक धोक्यात आले असून, काढणीसाठी तयार असलेली केळी शेतातच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
एकेकाळी निर्यातीसाठी 20 ते 22 रुपये किलोने विकली जाणारी केळी, आज 7 ते 8 रुपये किलोनेही व्यापारी घेण्यास तयार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या गॅस सिलेंडर टंचाईच्या मुद्द्यावरून माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेने कुडाळ तहसील कार्यालयावर धडक दिली. सर्वसामान्य जनतेला वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे हाल होत असून, प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसील कार्यालयाच्या आवारात जमलेल्या शिवसैनिकांनी केंद्र सरकार व स्थानिक प्रशासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र मिळत नाही सिलेंडर' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सोमवार पर्यंत गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाधीकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे
कोल्हापूरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर येथे सध्या पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे १४ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, भाविकांना देवीच्या उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील दैनंदिन नित्य धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. १८ मार्च २०२६ पासून देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
श्रीगोंदा मार्गांवरील कोळगाव फाटा येथे ट्रक आणि तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात तर अपघाताचा CCTV व्हिडीओ आला समोर....
अपघात इतका भीषण होता कीं वाहतूक टँकरच्या कॅबिनचा झाला चक्काचूर तर ट्रक मधील कांद्याची पोती विखरली रस्त्यावर...
घडलेल्या अपघातात सुदैवाने कोणाचीही जीवितहानी नाही मात्र याचं ठिकाणी होत असलेल्या अपघातात जात आहे अनेकांचे बळी...
वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयात एक धक्कादायक आणि फसवणूकीची घटना उघडकीस आली आहे. तहसील कार्यालयातील चेक लंपास करून खात्यातून 5 लाख 58 हजार रुपये चोरीला गेलेत आहे.. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, सरकारी कार्यालयांमधील कागदपत्रे आणि धनादेशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमर साबळे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन केले. देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. देशाला महागाईच्या खाईत घालणाऱ्या आणि एफस्टिन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याने नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. अविनाश भोसीकर यांनी केली आहे.
वाशिमच्या मानोरा शहरात शुल्लक कारणातून शेजाऱ्यांनी पती पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली असून हा प्रकार सीसीटीव्ही सुद्धा कैद झाला आहे.. तू आमच्या समोर स्टाईल का मारतो म्हणून शेजारी राहणाऱ्यानी एका व्यक्तीला रॉडने पायावर मारहाण करत लाथा सुद्धा मारत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.. सोबतच पत्नी सुद्धा गंभीर जखमी झाल्याची बाब समोर आली आहे..शारदा निळखण यांच्या तक्रारीवरून मानोरा पोलीस स्टेशन मध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..अमर निळखण असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर शारदा निळखण गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे महाराष्ट्र मध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे मराठवाड्याच्या हिंगोलीत मागिल 24 तासापासून ग्राहकांचा गॅस ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने एकच खळबळ उडाली आहेत तर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी गॅस एजन्सीच्या दारात गर्दी करत सिलेंडर देण्याची विनंती केली आहे दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे गॅस बुकिंग होत नसल्याचे स्पष्टीकरण गॅस एजन्सी कडून देण्यात आले असून नागरिक मात्र तासंतास गॅस एजन्सी बाहेर रांगा लाऊन उभे आहेत, हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन करत हिंगोली जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण
पोलीसत तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर
आरोपी चैतन्य विनोद शेंडे वय १८ मुळचा चंद्रपूर मधील असून त्याला पोलिसांनी अटक केली
टेलिग्रामचा वापर करून पैसे उकळण्यासाठी बनाव
राज्यात मोठ्या प्रमाणावर सर्वत्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद करण्यात आल्याने हॉटेल चालकांना त्याचा फटका बसू लागला आहे.नाशिकच्या येवला शहरात सावजी मटन खानावळ बाहेरुन येणा-या खवय्यांसाठी प्रसिध्द आहे, येवल्यात प्रसिध्द असलेल्या बळीराजा हॉटेल मालकांना अखेर सीलेडरच्या तुटवड्या मुळे चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली आहे.तेव्हा सरकारने तातडीने व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी हॉटेल मालकांनी केलीय.
कोकणातील आंबा बागायतदार आता दुहेरी संकटात
हापूस आंब्याच्या निर्यातीवर आता अडचण निर्माण झालंय
साधारण एप्रिलच्या पहील्या आठवड्यात हापूसची निर्यात सुरु होते
देशभरातून 29 हजार मेट्रीक टन आंब्याची होते निर्यात
तर महाराष्ट्रातून 21 हजार मेट्रीटक इतकी सर्वाधिक आंबा निर्यात
आखाती देशात मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात
25 टक्के आखाती देशात निर्यात होतो
साधारण एप्रिलच्या पहील्या आठवड्यापासून निर्यात होण्यास होते सुरुवात..
बदलत्या हवामानामुळे केवळ 20 ते 30 टक्केच यावर्षी आंब्याचं उत्पादन
आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट बळीराजाच्या खिशाला
मागणी कमी झाल्याने भाजीपाला खरेदीवर मोठा परिणाम
सर्वच फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी घसरले
काही हॉटेल आणि रेस्टोरंट बंद झाले काहींनी मेनू कमी केल्यामुळे परिणाम
व्यापाऱ्यांचे मोठ नुकसान होत असून पुढे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता.
नवी मुंबई घरगुती गॅसची टंचाई गॅस एजन्सी समोर एक ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा... नागरिक पहाटे तीन वाजल्यापासून रांगेत गॅस कधी मिळतोय याची नागरिक प्रतीक्षा करत आहे काही काही नागरिक दोन दिवसापासून रांगेत युद्धाचा परिणाम नवी मुंबईतील घरगुती गॅस वरती देखील पाहायला मिळत आहे
बांबू पासून एलपीजी गॅस बनवणे शक्य असल्याचा दावा जालन्यातील बांबू लागवड चळवळीचे डॉ.सुयोग कुलकर्णी यांनी केला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथे उद्योग मंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीत उद्योग मंत्रासमोर कुलकर्णी यांनी ही संकल्पना मांडली आहे.बांबू पासून तयार होणाऱ्या सीनगॅसपासून प्रोपेन आणि ब्युटेन गॅस तयार करू शकतो असा दावा देखील डॉ.कुलकर्णी यांनी केला आहे. तर बांबू पासून एलपीजी गॅस बनवल्यास भविष्यात एलपीजी गॅस साठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही असं मत डॉ.कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे .
मोदी सरकारने अचानक घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपये वाढ करून सर्वसामान्य जनतेवर मोठा आर्थिक बोजा टाकला आहे. तसेच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे आज अमरावतीमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक झाला, अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून पोळ्या भाजण्यात आल्या, तसेच खाली सिलेंडर ठेवून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या, तातडीने सरकारने सिलेंडरची दरवाढ कमी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली
गॅस घेण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी सिंहगड रोड पानमळा परिसरात नागरिकांच्या रांगा
सकाळी साडेसहा पासून नागरिक रांगा करून उभे आहेत
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे त्याचा परिणाम घरगुती गॅसवर ही झालाय
सिंहगड रोड वरती असलेल्या गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर रांगा करून नागरिक गॅस घेण्यासाठी थांबले आहेत
जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतल्याची घटना घडली...
चालकाला वेळीच प्रकार लक्षात आल्याने त्याने बुलेट जागेवर सोडून पळ काढल्याने अनर्थ टळला...
न्यायालय आवारातील कर्मचाऱ्याने फायर एक्सटिंग्विशर च्या दुचाकीला लागलेली आग विझवली...
उष्णतेचा कडाका वाढल्याने वाढत्या तापमानामुळे देखील प्रचंड तापल्याने बुलेट ने पेट घेतला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे..
न्यायला आवारात बुलेटने पेट घेतलेल्या या घटनेची चांगली चर्चा रंगली होती.
लातूर मध्ये देखील व्यावसायिक गॅस तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, हॉटेल व्यवसाया बरोबर आता शासकीय वस्तीग्रहणांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय, लातूर मधील समाज कल्याणच्या 1000 मुला-मुलींच्या शासकीय वस्तीगृहात भोजन व्यवस्था कोलमडली आहे, मागच्या दोन दिवसापासून विद्यार्थ्यांना केवळ डाळ भाताचा मेनू दिला जातो आहे , स्वयंपाक घरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने ही वेळ आल्याचं सांगितलं जाते आहे , तर गॅस मिळत नसल्याने आता वस्तीगृहात चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
आखाती देशातल्या युद्धामुळे सांगली जिल्ह्यात व्यवसायिक गॅस सिलेंडरवर मोठा परिणाम झाला आहे.. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ आता सांगलीतील हॉटेल व्यवसायिकांवर आली आहे.सुरळीत गॅस पुरवठा करा,अन्यथा हॉटेल व्यवसाय बंद करावे लागतील,असा इशारा हॉटेल व्यवसायिकांकडून प्रशासनाला देण्यात आला होता.. मात्र आज पासून अनेक हॉटेल्समध्ये गॅस सिलेंडर संपल्याने हॉटेल बंद करावे लागेल आहेत..हॉटेलच्या बाहेर गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने हॉटेल बंद करावे लागत असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
आखाती देशात गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आता थेट सामान्यांच्या खिशाला कात्री बसू लागली आहे. आश्चर्य वाटेल, पण तुमच्या तहानलेल्या घशाला कोरड घालणाऱ्या पाण्याच्या बॉटलचे दर आता कडाडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बॉटल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, जो चीनमधून आयात केला जातो, तो आता रखडला आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता ताडोबासारख्या जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पावरही दिसून येत आहे. ताडोबाचा हंगाम आता जोरात सुरू झाला असून पर्यटकांचा मोठी आवक इथे आहे. पुढील महिनाभराचे बुकिंग फूल आहे. एकीकडे पर्यटकांची गर्दी आहे, तर दुसरीकडे या पर्यटकांच्या भोजन व्यवस्थेची चिंता हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने स्वयंपाकघरात शुकशुकाट दिसून येत आहे. छोट्या टपऱ्यांचीही हीच अवस्था आहे. कुणाकडे आठ दिवसांचा, कुणाकडे दहा दिवसांचा तर कुणाकडे पंधरा दिवसांचा सिलेंडरसाठा शिल्लक आहे. त्यानंतर काय, असा प्रश्न सर्वांनाच त्रस्त करीत आहे. व्यवसाय बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गॅस टंचाईमुळे थंड झालेले अन्न गरम करून दिले जात नाही. जेवणही मोजकेच दिले जात आहे. गॅस जेवढा वाचवता येईल, तेवढा वाचवण्याचे प्रयत्न इथे केले जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामती दौऱ्यावर असून सकाळपासून त्यांचा सहयोग यांनी जनता दरबार सुरू असून नागरिक त्यांना भेटत आहेत.. आपल्या समस्या अडचणी ज्या पद्धतीने दिवंगत नेते अजित पवार यांना बारामतीकर सांगत होते त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा देखील आता जनता दरबार भरला असून नागरिक समस्या मांडत आहेत. जनता दरबार झाल्यानंतर सुनेत्रा पवार बारामती शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत
हिंगोलीत पोलीस अधीक्षक कार्यालयात पेट्रोल घेऊन सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न
पाच लिटर पेट्रोलची कॅन पोलीस कर्मचाऱ्यांनी हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला
खुनाच्या प्रकरणात आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप
राजू लालू पापळकर असे आत्महत्या झालेल्या व्यक्तीचे नाव
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भारत नगर 11 मार्च रोजी सापडला होता मृतदेह
घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराविरोधात नवी मुंबईत काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारने गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली.
गॅस सिलेंडरचे दर सतत वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
काल अमरावती ठरले देशातील सर्वात उष्ण शहर; काल अमरावती 42.2 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचे हे तापमान जास्त असल्याची माहिती.
मार्च महिन्यातच विदर्भात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे..
उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे वाढत्या तापमानाचा परिणाम शेतीवरही परिणाम संत्रा बागांना बसतोय फटका.
हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
अमरावतीमध्ये सलग दुसऱ्याही दिवशी सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून ग्राहकांच्या रांगा....
अमरावतीच्या अंबा देवी मंदिर परिसरामध्ये अनेक ग्राहक सकाळी पाच वाजता पासून रांगेत.....
दुकान उघडण्यापूर्वीच सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी.
आखाती देशातील युद्धामुळे राज्यसह मावळात गॅस टंचाई निर्माण झालेली आहे. गॅस टंचाईमुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की व्यवसाय बंद होण्याच्या उंबरठ्यावर आला असून सध्या फक्त पुढील दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध असल्याची माहिती मगनलाल चिक्की चे संचालक मंगेश अग्रवाल यांनी दिली आहे. चिक्की उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गॅसची गरज भासते आणि त्यावरच संपूर्ण उत्पादन प्रक्रिया अवलंबून असल्यामुळे गॅस तुटवडा झाल्याने उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान आखाती देशातील युद्धाच्या परिणामामुळे गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम होत असल्याने त्याचे थेट परिणाम लोणावळ्यातील पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांवरही दिसू लागले आहेत, लोणावळ्यात चिक्कीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते मात्र गॅस टंचाई कायम राहिल्यास ही संपूर्ण उलाढाल थांबण्याची भीती व्यक्त केली जात असून स्थानिक व्यावसायिकांनी तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आल्यामुळे त्यांच्याकडे अध्यक्षपद द्यावे, अशी भूमिका घेण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भाजपने जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मदतीने हे पद मिळवण्याचा प्रयत्न केला होता. येत्या मंगळवारी, १७ तारखेला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार असून त्याआधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
गॅस घेण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी सिंहगड रोड पानमळा परिसरात नागरिकांच्या रांगा
सकाळी साडेसहा पासून नागरिक रांगा करून उभे आहेत
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे त्याचा परिणाम घरगुती गॅसवर ही झालाय
सिंहगड रोड वरती असलेल्या गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर रांगा करून नागरिक गॅस घेण्यासाठी थांबले आहेत
बातमीय बीड मधून मस्त जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याचा भाऊ श्रीराम साठे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी जयराम चाटे आज एक दिवसासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जेल बाहेर येणार आहे. एक दिवसाची परवानगी मिळावी म्हणून जयराम साठीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये परवानगी मागितली होती आणि न्यायालयाने पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे
शांतता दिवसाच्या निमित्ताने आज मुस्लिम समाज पुण्यात दहशतवादाच्या विरोधात विशेषता पॅलेस्टाईन मध्ये होत असलेल्या अत्याचार व वरिष्ठ धर्मगुरू अयातउल्ल सय्यद अली खामेनाई यांच्या हत्येच्या निषेधार्थ कार्यालय येथे आज दुपारी दोन ते चार या वेळेत दरम्यान शांतता मोर्चाचे आयोजन
शहरातील अनेक सामाजिक संघटना ही सहभागी होणार
सोमजी पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांतता मोर्चा असणार
नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर करणार सादर
स्थायी समितीला हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे
आर्थिक स्त्रोतापासून तिजोरीत महसूल जमा न झाल्याने ती तूट कशी भरून काढणार याकडे लक्ष
महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त म्हणून डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी 2025- 26 ला आर्थिक वर्षाचा 5438.61 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला होता
परंतु नगररचना आणि मालमत्ता करापासून अपेक्षित उत्पन्न गाठता आले नाही. त्यामुळे आता यावर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन आयुक्त नेमकं काय धोरण आखाणार याकडे लागला आहे लक्ष
गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सुचना
पुणे शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या.
गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शहरातील परिस्थितीची माहिती घेतली.
महापौर नागपुरे यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुणे शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून दररोज सुमारे १० हजार सिलेंडरचे वितरण नियमितपणे करण्यात येत आहे.
शहरातील सुमारे ८५ टक्के सिलेंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे.
गॅस वितरण कंपन्यांच्या समन्वयातून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन सिलेंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही नागपुरे यांनी केले.
गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून पुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यवतमाळ जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी सिलेंडर मिळण्यास होणाऱ्या विलंबनामुळे ग्रामीण भागात नागरिकांनी पर्यायी व्यवस्थेकडे वळण्यास सुरुवात केली आहे गॅस जास्त दिवस चालावा यासाठी अनेक घरांमध्ये पुन्हा चुली पेटू लागल्या असून महिलांकडून रानातून इंधन गोळा करण्याची लगबग सुरू झाली आहे.
शहरातील वस्तीगृह रुग्णालयांना घरगुती गॅसचा पुरवठा करा मुख्य सचिवांचे आदेश
अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट असलेल्या सरकारी खाजगी रुग्णालयासोबत सरकारी विध्यार्थी वस्तीग्रहणांना घरगुती गॅसचा पुरवठा होणार
कमर्शियल गॅस बुकिंग बंद झाल्यानंतर मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना घरगुती गॅस पुरवठा करण्याचे आदेश
पुणे शहर जिल्ह्यात घरगुती गॅसचा कुठेही तुटवडा नाही जादा दराने विक्री केला तर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
गॅस वितरणासाठी पोलीस संरक्षण देण्याची गॅस एजन्सी चालकांची मागणी
युद्धामुळे स्टॅंडर्ड डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट सिस्टम पूर्णपणे कोलमडले त्यामुळे नागरिकांचा संताप
नागरिकांकडून गॅस बुक करताना बुकिंग होत नसल्याने नागरिक जाब विचारण्यासाठी एजन्सीकडे येत आहेत
तेल कंपनीच्या मुख्य प्रकल्पातून पुरेसं सिलेंडर पुरवठा होत नसल्याने वितरणता अडथळे आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत
एजन्सीच्या कार्यालयात ग्राहकांची गर्दी होत असून काही ठिकाणी सिलेंडर वितरण कर्मचाऱ्यांना अडवून जाब विचारला जात आहे
शहरातील गॅस एजन्सीच्या प्रतिनिधी बैठकीत गॅस एजन्सीच्या चालकांची पोलीस संरक्षण देण्याची मागणी
डोमेस्टिक एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी गडचिरोली कर यांनी लांबच लांब राग लावली आहे गडचिरोली येथील एचपी गॅस च्या एजन्सी बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गडचिरोली करांनी मोठी रांग लावली आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सी कडून सध्या कमर्शियल गॅसचा सिलेंडर पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला असून फक्त डोमेस्टिक गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही डोमेस्टिक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गडचिरोली लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
भरधाव ट्रक अंगावर; प्रसंगावधानाने तरुणाचा थरारक बचाव
शिरूर–सोलापूर महामार्गावरील करडे येथे एका तरुणाचा थरारक बचाव झाल्याची घटना समोर आलीय
भरधाव ट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात येताच तरुणाने प्रसंगावधान राखत क्षणात दुचाकी सोडून बाजूला पळ काढला आणि मोठा अपघात टळला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात उद्योग क्षेत्रासमोर गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक झाली.
या बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, तसेच पोलीस अधीक्षक विनय पवार राठोड उपस्थित आहेत. यासोबतच शहरातील प्रमुख औद्योगिक संघटना जसे की CMIA, MASSIA आणि CAIA यांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. उद्योग क्षेत्राला सध्या भेडसावत असलेल्या गॅस तुटवडा तसेच इतर विविध अडचणींवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.