Siddhi Hande
काजूचा सीझन सुरु झाला आहे. कोकणात तर ओले काजू खूप आले आहेत.
ओल्या काजूंची छान चमचमीत भाजी केली जाते. त्यासाठी ओले काजू सोलणे हे खूप कठीण काम असते. पण ही भाजू खूप चविष्ट लागते.
ओले काजू, कांदा, टॉमेटो, आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता, सुकं खोबर, कोथिंबीर, नारळाचे दूध
सर्वात आधी तुम्हाला ओले काजू कोमट पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवायचे आहे. यामुळे चांगली चव येते.
वाटण तयार करण्यासाठी सुकं खोबर, कांदा, लसूणस आलं आणि कोथिंबीर भाजून घ्या.
यानंतर हे मिश्रण मिक्सरला बारीक करुन घ्या. या मिश्रणात दोन चमचे पाणी टाका.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या.
यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टॉमेटो परतून घ्या. त्यात हळद, तिखट मसाला, मालवणी मसाला टाकून परतून घ्या.
यानंतर भिजवलेले काजू आणि कांदा-खोबऱ्याचं वाटण टाका. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्या.
यानंतर गरजेनुसार पाणी टाकून शिजवून घ्या. काजू चांगले शिजल्यानंतर तुम्ही ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतात.