Utkarsh Anand shinde latest Post on Instagram:
दिवंगत प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांचा आवाज महाराष्ट्रासहित जगभरात पोहोचला आहे. भक्तीगीत, लोकगीत, सिनेमातील गीत अशा नानाविविध गाण्यांमधून शिंदेशाहीने लोकांची मने जिंकली आहेत. शिंदेशाहीने गायनक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर याच शिंदेशाहीने आता नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. (Latest Marathi News)
अभिनेता, गायक डॉ. उत्कर्ष शिंदेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शिंदेशाहीने उद्योग क्षेत्रात पदार्पण केल्याची माहिती दिली आहे. यानंतर शिंदेशाहीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उत्कर्ष शिंदेने काय सांगितलं?
उत्कर्ष शिंदे म्हणाला की, 'छत्रपती शिवबा ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले,अण्णाभाऊ साठे यांच्यासहित अन्य महात्म्यांच्या विचारांना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. बाबासाहेब तुम्ही म्हणालात, शिका. आम्ही गायक,डॉक्टर , इंजिनिअर झालो. तुम्ही म्हणालात संघटित व्हा, संघर्ष करा. तर आम्ही एक कुटुंब राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पुढे सरसावलो'.
'रस्त्यावर भजन गाणारी एक पिढी मंदिरात देवाला जागवणारी. तर दुसरी पिढी,लोकसंगीतातून महाराष्ट्राला सण साजरे करताना नाचवणारी. आता तिसरी पिढी आज चित्रपटातून सर्वांच्या गळ्याचे ताईत होणारी आहे. चौथी पिढी न थकता न थांबता फक्त कामावर प्रेम करणारी आहे, असे तो पुढे म्हणाला.
'महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन “तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या ब्रीदवाक्याला सदैव मनात कोरून,काम करणारे आमचं शिंदे कुटुंब. भजन, कव्वाली,गायन ,चित्रपट गीते,आता चित्रपटात अभिनेता ते डॉक्टर डिग्री दवाखाने ते आता उद्योग जगात पदार्पण करत आहे. शिंदे परिवाराच पहिलं पेट्रोल पंप.वेळापूर (पंढरपुर)येथे सुरू झालं, अशी माहिती उत्कर्षने दिली.
'छत्रपती शिवबा ,महात्मा जोतीबा,अण्णा भाऊ ते अन्य महात्म्यांच्या विचारांना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. रसिक माय बापाने भरभरून प्रेम दिलं, त्या प्रेमाची परतफेड आम्हाला कधीच करता येणार नाही. आम्ही हर्षद-आदर्श-उत्कर्ष असेच मेहनत करत राहू, पण त्याल साथ हवी तुमच्या आशीर्वादाची. क्यूकी जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है। अभी तो नापी है, मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, असं आवाहन देखील त्यानं चाहत्यांना केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.