Lal Salaam Teaser: ‘मुकाबला नही युद्ध है...’; दिवाळीत रजनीकांतचा चाहत्यांना ‘लाल सलाम’, सिनेमाचा टीझर रिलीज

Rajinikanth Film Teaser: ‘जेलर’नंतर रजनीकांत यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपल्या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
Lal Salaam Teaser
Lal Salaam TeaserSaam Tv
Published On

Lal Salaam Teaser

टॉलिवूडचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, अवघ्या जगभरात आपल्याला पाहायला मिळतो. कायमच रजनीकांत आपल्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहतात.

‘जेलर’नंतर रजनीकांत यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘लाल सलाम’ (Lal Salaam) असं आहे.

Lal Salaam Teaser
Kalidas Jayaram Engagement: कालिदास जयरामने मिस यूनिवर्स इंडियाच्या रनर-अपसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित ‘लाल सलाम’चा टीझर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रिलीज झाला आहे. रजनीकांतसोबत चित्रपटामध्ये विष्णू विशाल आणि विक्रांत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुलगी ऐश्वर्या रजनीकांत करणार आहे. चित्रपट थिएटरमध्ये, २०२४मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये चाहत्यांना स्पोर्ट्स ड्रामा पाहायला मिळणार असून सध्या टीझरची जोरदारची चर्चा हाेताना दिसत आहे. (Tollywood)

शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यामधील काही दृश्य दिसत आहेत. त्या मॅच दरम्यान होत झालेल्या दंगलीने आणि सुपरस्टार रजनीकांतच्या अफलातून ॲक्शन सीनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कॅमिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलेय. रजनीकांत यांच्या अवघ्या काही सेकंदाच्या एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या चार भाषेंमध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

Lal Salaam Teaser
Amruta- Prasad Kelvan: प्रसाद- अमृताची लगीनघाई; केळवणाचा शेवटचा व्हिडीओ केला पोस्ट, आता लग्नाचे वेध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com