Pongal 2023 : पोंगलसाठी बनवा तांदळापासून 'ही' खास डिश, जाणून घ्या कृती

तामिळनाडूमध्ये देखील मकरसंक्रांती म्हणजेच पोंगल अगदीं जल्लोषात साजरा केला जातो.
Pongal 2023
Pongal 2023Saam Tv
Published On

Pongal 2023 : तामिळनाडू मधील सर्वात महत्त्वाचा आणि आवडता सण म्हणजे पोंगल. आता पोंगल म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी हा महिना अत्यंत महत्वाचा पर्व मानला जातो.

या महिन्यामध्ये मकर संक्रांती आणि वसंत पंचमी साजरी केली जाते. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये देखील मकरसंक्रांती म्हणजेच पोंगल अगदीं जल्लोषात साजरा केला जातो. जाणून घेऊया पोंगल सणाबद्दल.

पाहायला गेलं तर मकर संक्रांती हा सण नेहमी 14 जानेवारीला येतो. पण या वर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांती (Makar Sankranti) येत आहे. मकर संक्रांतीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावे दिली आहेत.

Pongal 2023
Makar Sankranti 2023 Upay : कुंडलीतील सूर्य ग्रहाला अधिक मजबूत करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'हे' उपाय, होईल वर्षभर धनलाभ !

जसे उत्तर पूर्व राज्यांमध्ये खिचडी, गुजरातमध्ये उत्तरायण आणि दक्षिण राज्यांमध्ये पोंगल या नावने ओळखलं जातं. पोंगल हा सण चार दिवसांचा असतो आणि हा सण मुख्यतः तामिळनाडू येथे साजरी करतात.

ज्यामध्ये भगवान सूर्य देवाची आराधना केली जाते. या दिवशी नवीन पीक येण्याचा आनंद साजरा (Celebrate) केला जातो. घरोघरी चविष्ट पंचपकवान केले जातात. त्याचबरोबर पोंगल सण साजरा करताना भाताचे अनेक पदार्थ तयार केले जातात. भाताच्या खिचडी पासून भाताचा गोड पदार्थ देखील बनवला जातो. जाणून घेऊया पदार्थांची रेसिपी.

पोंगलमध्ये भातापासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याची

साहित्य : भात, मुग डाळ, साजूक तूप, जीरा, आलं, कढीपत्ता आणि काळी मिरी.

Pongal Recipe
Pongal Recipe canva

कृती :

  • सर्वात आधी भात (Rice) आणि मुगाच्या डाळीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

  • नंतर कुकरमध्ये सजून तूप घालून गरम करून घ्या.

  • बारीक गॅस वरती मुगाची डाळ टाकून परतून घ्या.

  • मुगाची डाळ चांगली खमंग परतून झाल्यावर त्यामध्ये भात टाका.

  • नंतर भातात तीन ते चार कप पाणी (Water) घालून चवीनुसार मीठ टाका.

  • नंतर कूकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या.

  • नंतर एका पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घ्या.

  • नंतर त्यामध्ये जिर, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेल अद्रक आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगल परतून घ्या.

  • त्यानंतर कढीपत्ता घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्या आणि गॅस बंद करून लगेचच हिंगचा तडका द्या.

  • तयार झाली तुमची पोंगल स्पेशल खास डिश या डिशला नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com