Kalidas Jayaram Engagement: कालिदास जयरामने मिस यूनिवर्स इंडियाच्या रनर-अपसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Kalidas Jayaram Engagement: अभिनेता कालिदास जयरामने शुक्रवारी मॉडेल तारिणी कलिंगरायारसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
Kalidas Jayaram Engagement
Kalidas Jayaram EngagementInstagram
Published On

Kalidas Jayaram Engagement

अभिनेता कालिदास जयरामने शुक्रवारी मॉडेल तारिणी कलिंगरायारसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत काल अर्थात ११ नोव्हेंबरला गुपचूप साखरपुडा केला आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

'विक्रम', 'हॅपी सरदार' आणि 'पूमाराम' सारख्या चित्रपटामध्ये या दोघांनीही एकत्रित काम केले आहे. कालिदासने गर्लफ्रेंड तारिणीसोबत गुपचूप साखरपुडा केल्यानंतर सोशल मीडियावर दोघांवरही चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एंगेजमेंटला तारिणी आणि कालिदासने पीच रंगाचा ड्रेस परिधान करच सर्वांचेच लक्ष वेधले होते. दोघांच्याही पारंपारिक लूकचे नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत आहेत. (Tollywood)

Kalidas Jayaram Engagement
Amruta- Prasad Kelvan: प्रसाद- अमृताची लगीनघाई; केळवणाचा शेवटचा व्हिडीओ केला पोस्ट, आता लग्नाचे वेध

अभिनेता कालिदास जयरामने त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना, त्याने अंगठीचा आणि हार्टचा इमोजी कॅप्शन म्हणून टाकत फोटो शेअर केले आहेत. तर आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी "आम्ही एंगेज झालो." म्हणत फोटो शेअर केले. कालिदास आणि तारिणी यांनी रोमँटिक पोज देत फोटो शेअर केले आहेत. टॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे जयराम आणि पार्वती यांचा अभिनेता कालिदास हा मुलगा आहे. सध्या त्यांचे एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (Social Media)

Kalidas Jayaram Engagement
Bollywood Couples Celebrate The First Diwali: परिणीती- राघवसह आथिया- राहुल सेलिब्रेट करणार लग्नानंतरची पहिली दिवाळी, जाणून घ्या एकाच क्लिकवर...

कालिदास जयरामच्या कामाबद्दल बोलायचे तर, लवकरच कालिदास कमल हासनच्या ‘इंडियन २’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याने आपल्या सिनेकारकिर्दिची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. तर त्याची पत्नी मॉडेल तारिणी कलिंगरायारबद्दल बोलायचे तर, ती एक मॉडेल असून तिने २०२१ मध्ये मिस युनिव्हर्स इंडियाची तिसरी उपविजेती ठरली होती. ती अनेकदा फॅशन इव्हेंटमध्येही स्पॉट झाली. हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना स्पॉट करत असून त्यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्रित कामही केले आहे. (Entertainment News)

Kalidas Jayaram Engagement
Bigg Boss 17 Weekend Ka War: ...अन् सलमान खानचा पारा चढला, राडा करणाऱ्या स्पर्धकांची घेतली शाळा; यावेळी कोण घराबाहेर जाणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com