Reema Lagu Birth Anniversary : बॉलिवूडची ‘कूल आई’!  ‘सिंगल मदर’ रिमा लागू यांनी लेकीचा सांभाळ कसा केला? जाणून घ्या
Reema Lagu Birth Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Reema Lagu Birth Anniversary : बॉलिवूडची ‘कूल आई’! ‘सिंगल मदर’ रिमा लागू यांनी लेकीचा सांभाळ कसा केला? जाणून घ्या

Chetan Bodke

रुपेरी पडद्यावरची ग्लॅमरस आई म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचा आज जन्मदिवस आहे. १९८० मध्ये रिमा यांनी 'कलयुग' चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला आहे. अभिनय करताना रिमा लागू यांनी १० वर्षे बँकेत नोकरीही केली. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. रिमा यांना अभिनयाचा वारसा हा आईकडूनच मिळालेला होता. आज रिमा लागू यांचा जन्मदिवस आहे, त्यांच्या जन्मदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

रिमा लागू यांचं खरं नाव नयन भडभडे असे होते. त्या मराठी इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. रिमा लागू यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी सिनेसृष्टीतून केली होती. अनेक वर्षे मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर रिमा यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

रिमा यांचा शालेय शिक्षण सुरू असतानाच अभिनयाकडे कल वाढू लागला होता. रिमा लागू यांनी प्रसिद्ध मराठी कलाकार विवेक लागू यांच्याशी लग्न केले होते. पण त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. नात्यामध्ये तणाव वाढल्यामुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं. पतीपासून वेगळं राहत रिमा यांनी मुलीचे संगोपन केले.

विवेक लागू यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर, रिमा यांनी पुन्हा लग्न केले नाही. त्यांना मृण्मयी लागू नावाची मुलगी होती. रिमा यांनी आपल्या मुलीचे 'सिंगल मदर' म्हणून संगोपन केले आहे. रिमा लागू यांनी आपल्या मुलीसाठी विशेष मेहनत घेतली. त्यांनी आपल्या मुलीला वडिलांचे प्रेम केव्हाच कमी पडू दिले नाही. रिमा लागू यांनी आपल्या मुलीला स्वतःच्या पायावर उभे केले.

रिमा यांनी आपल्या करिअरमध्ये अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त यांसारख्या अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या आईचे पात्र त्यांनी साकारले होते. रिमा लागू यांनी आपल्या सिनेकरियरमध्ये तब्बल २५ हून अधिक चित्रपटांमध्ये 'आई'ची भूमिका साकारली होती. अनेक बॉलिवूड चित्रपटात रिमा लागू मुख्य अभिनेत्याच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. रिमा यांनी 'हम साथ साथ हैं', 'कुछ कुछ होता है', 'मैने प्यार किया', 'कल हो ना हो' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये लक्ष्यवेधी भूमिका साकारल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: रोहित अन् विराट कोहलीसह या 2 दिग्गजांनीही घेतली T20I क्रिकेटमधून निवृत्ती

Supriya Sule News: 'विधानसभेमुळे लाडकी बहिण, भाऊ सगळे आठवतील', अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला!

Hindavi Patil: चित्रपटातल्या हिरोईनपेक्षा कमी नाही तुझं सौंदर्य!

Marathi News Live Updates : कोल्हापूर पोलिस ॲक्शन मोडमध्ये, अवैध गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त

Pomegranate Crop : वातावरण बदलाचा डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT