Shaitaan Collection Day 5: अजय देवगण-आर माधवनचा 'शैतान' मंगळवारीही सुसाट, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा किती?

Ajay Devgan Film Shaitaan Box Office Collection Update in Marathi: या चित्रपटातील अजय देवगण आणि आर माधवनच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी ६० कोटींपार कमाई केली आहे.
Shaitaan Box Office Day 5 Box Collection
Shaitaan Box Office Day 5 Box CollectionSaam Tv

Shaitaan Movie Box Office Collection:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhvan) स्टारर 'शैतान' चित्रपटाची (Shaitaan Movie) सध्या प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली. हा चित्रपट दिवसेंदिवस चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटातील अजय देवगण आणि आर माधवनच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी ६० कोटींपार कमाई केली आहे.

8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला शैतान चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला चांगली कमाई केली. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी देखील या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. या चित्रपटामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा फॅमिली मॅनच्या भूमिकेत दिसला. तर आर माधवनच्या शैतानच्या भूमिकेला देखील प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत. विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत असून ते चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटाने चार दिवसांत बक्कळ कमाई केली आहे.

Sacnilk च्या अहवालानुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 14.75 कोटी रुपयांची कमाई केली. यासह हा चित्रपट या वर्षातील शानदार ओपनिंगसह बॉलिवूड चित्रपटांमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. या चित्रपटाने शनिवारी 18.75 कोटींची आणि रविवारी 20.5 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या सोमवारीही 7.25 कोटींचा गल्ला जमवला. सोमवारपासून या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यामध्ये घसरण पाहायला मिळाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारीही चित्रपटाच्या कमाईमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी या चित्रपटाने 6.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. अशाप्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत 68 कोटींची एकूण कमाई केली आहे.

Shaitaan Box Office Day 5 Box Collection
Kiran Rao: मी लग्न करून आले तेव्हा..., आमिर खान- रीना दत्ताच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली किरण राव

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर असं पहिल्यांदा घडत आहे की, एखादा हॉरर चित्रपट अशापद्धतीने कमाई करत आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सुट्टीच्या दिवसाचा चांगला फायदा करून घेतला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन सुट्टीचे असल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा झाला. सोमवारी या चित्रपटाची कमाई कमी झाली असली तरी देखील या चित्रपटाने कमाईचा आकडा 60 कोटी पार केला आहे. शैतान चित्रपटाच्या समोर दुसरा कोणाताच मोठा चित्रपट नाही. कोणतीही स्पर्धा नसल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा होताना दिसत आहे.

Shaitaan Box Office Day 5 Box Collection
'बडे मियाँ छोटे मियाँ' मधलं 'वल्लाह हबीबी' गाणं आऊट, Akshay Kumar आणि Manushi Chhillar ची जबरदस्त केमिस्ट्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com