Mirzapur 3 Trailer |'मिर्झापूर ३' चा खतरनाक ट्रेलर पाहिलात का? एकेक सीन बघितल्यावर अंगावर सर्रकन काटा येईल, VIDEO

Mirzapur 3 : गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते 'मिर्झापूर ३' या बहुप्रतिक्षित वेबसीरीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आज या सीरीजचा ट्रेलर रिलीज झालेला आहे.
Mirzapur 3 Trailer : 'मिर्झापूर ३' चा खतरनाक ट्रेलर पाहिलात का? एकेक सीन बघितल्यावर अंगावर सर्रकन काटा येईल, VIDEO
Mirzapur 3 TrailerSaam Tv

गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते 'मिर्झापूर ३' या बहुप्रतिक्षित वेबसीरीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर (Mirzapur) आणि 'मिर्झापूर २' (Mirzapur 2) या दोन्हीही सीरीजला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला 'मिर्झापूर ३' सीरीज येणार आहे. नुकताच या सीरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. ट्रेलरची सुरूवातच रक्तरंजित दृश्यांनी झालेली पाहायला मिळत आहे. मारधाड आणि जबरदस्त डायलॉगने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Mirzapur 3 Trailer : 'मिर्झापूर ३' चा खतरनाक ट्रेलर पाहिलात का? एकेक सीन बघितल्यावर अंगावर सर्रकन काटा येईल, VIDEO
Renuka Swamy Case Update : रेणुकास्वामी हत्येप्रकरणी दर्शनच्या पत्नीची चौकशी, घरातून मिळाले महत्वाचे पुरावे

'मिर्झापूर 3' च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतंय की, 'मिर्झापूर २'च्या शेवटी कालीन भैय्या गायब झालेले आहेत. त्यामुळे मिर्झापूरमध्ये गुड्डू पंडीत राज्य करायला सज्ज होताना दिसत आहे. त्याच्यासोबत गोलूही दिसतोय. लक्षवेधी संवाद, धडाकेबाज ॲक्शन सीन्स आणि सत्तेसाठी मनात असलेली हव्यास आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, ट्रेलरच्या शेवटी पंकज त्रिपाठींची म्हणजेच कालीन भैय्याची एन्ट्री होतेय. 'हम वौ करवाएंगे जो पूर्वांचल के इतिहास में आज तक नही हुआ' असा निर्धार कालीन भय्या करताना दिसत आहेत.

'मिर्झापूर ३' सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठीसह अली फजल, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी, रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'मिर्झापूर ३'ची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. ही सीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर ५ जुलै २०२४ ला रिलीज होणार आहे.

Mirzapur 3 Trailer : 'मिर्झापूर ३' चा खतरनाक ट्रेलर पाहिलात का? एकेक सीन बघितल्यावर अंगावर सर्रकन काटा येईल, VIDEO
Farhan Akhtar Film : 'डॉन ३'च्या शुटिंगला केधीपासून सुरूवात होणार ?, फरहान अख्तरने दिली महत्वाची अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com