Farhan Akhtar Film : 'डॉन ३'च्या शुटिंगला केव्हापासून होणार सुरूवात?, फरहान अख्तरने दिली महत्वाची अपडेट

Farhan Akhtar On Ranveer Singh Don 3 Film : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'डॉन ३' चा प्रोजेक्ट बंद केल्याची चर्चा सुरू झाली होती. अशातच या चर्चांवर खुद्द दिग्दर्शक फरहान अख्तरने भाष्य केले आहे.
'डॉन ३'च्या शुटिंगला केव्हापासून होणार सुरूवात?, फरहान अख्तरने दिली महत्वाची अपडेट
Farhan akhtar Talk About Don 3 FilmSaam Tv

'डॉन' (Don) चित्रपटाच्या प्रत्येक सिक्वेलला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळालेला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यानंतर आता 'डॉन' म्हणून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक फरहान अख्तर यांनी 'डॉन ३' ची घोषणा केलेली आहे. चित्रपटामध्ये नवा डॉन दिसणार म्हणून अनेकांनी चित्रपटाला विरोध केलेला होता. अशातच आता दिग्दर्शक फरहान अख्तरने चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती दिलेली आहे.

'डॉन ३'च्या शुटिंगला केव्हापासून होणार सुरूवात?, फरहान अख्तरने दिली महत्वाची अपडेट
Alyad Palyad Collection : गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड'ची बॉलिवूड चित्रपटांना टक्कर, आठवड्यातच कमाई कोटींच्या पल्याड

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'डॉन ३' चा प्रोजेक्ट बंद केल्याची चर्चा सुरू झाली होती. पण अशातच आता या चर्चांवर खुद्द दिग्दर्शक फरहान अख्तरने भाष्य केले आहे. मुलाखतीमध्ये दिग्दर्शक फरहान अख्तरने सांगितले की, "चित्रपटावर अजुनही काम सुरू आहे. प्रोजेक्ट बंद झालेला नाही. चित्रपटाच्या शुटिंगची सुरूवात २०२५ पासून सुरूवात होणार आहे. कारण की, रणवीर सिंहला त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे."

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शुटिंगला २०२५ पासून सुरूवात होणार आहे. कारण की, रणवीरला त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. येत्या सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका आणि रणवीर आई- बाबा होणार आहेत. त्यानंतर तो काही दिवस आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणार आहे. रणवीर 'डॉन ३' व्यतिरिक्त अन्य चित्रपटांतही दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'डॉन ३'साठी निर्मात्यांनी रणवीरचे इतर प्रोजेक्ट्सही थांबवलेले आहेत.

'डॉन ३'च्या शुटिंगला केव्हापासून होणार सुरूवात?, फरहान अख्तरने दिली महत्वाची अपडेट
Sonakshi sinha And Shatrughan Sinha : "ती तिच्या इच्छेनुसार लग्न करते...", सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर सोडलं मौन

'डॉन ३' चित्रपटाबद्दल सांगायचे तर, या चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. त्याशिवाय रणवीर सिंह 'सिंघम अगेन'मध्येही दिसणार आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या १ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. अन्य चित्रपटांतूनही रणवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'डॉन ३'च्या शुटिंगला केव्हापासून होणार सुरूवात?, फरहान अख्तरने दिली महत्वाची अपडेट
Priyanka Chopra Injured : प्रियांका चोप्राचा सेटवर अपघात, The Bluff च्या शुटिंगवेळी घडली घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com