Priya More
साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.
विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.
हे कपल अनेक वेळा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत. आता हे कपल साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
विजय आणि रश्मिका एकत्र टाइम स्पेंड करत असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोंवरून हे कपल सध्या विएतनाममध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत असल्याच्या चर्चा होत आहेत.
काही दिवसांपूर्वीच साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले होते.
या फोटोंमध्ये विजय स्ट्रीट फूड खात हसताना दिसला. या फोटोंमध्ये तो खूपच आनंदी दिसत आहे.
रश्मिकाने देखील इन्स्टाग्रामवर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले होते. यावरून हे दोघही एकत्र असल्याचे म्हटले जात होते.
विजय देवराकोंडाच्या या फोटोंवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'रश्मिका मंदान्ना या हसण्याचे कारण आहे का?'
रश्मिका आणि विजय रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत आहेत. पण त्यांनी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.