Chetan Bodke
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे आणि तिच्या अभिनयामुळे चर्चेत आहे.
सई ताम्हणकर नेहमीच वेगवेगळ्या अंदाजामध्ये चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर मकर सक्रांतीनिमित्त ब्लॅक साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
ब्लॅक साडी आणि डिझायनर डिपनेक ब्लाऊज सईने परिधान केला आहे.
फॅशनेबल इयर रिंग्ज परिधान करत ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने नवं फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
'तिळगुळ पण लाजतील असा तुझा हा साज आहे...' असं म्हणत एका युजरने तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
येत्या २ फेब्रुवारीला सई आणि सिद्धार्थचा ‘श्री देवी प्रसन्न’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.