Chetan Bodke
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने नुकतंच मकर संक्रांती स्पेशल फोटोशूट केले आहे.
नुकतंच अभिनेत्रीने काळया साडीमध्ये खास फोटोशूट करत शेअर केले आहेत.
मकरसक्रांतीनिमित्त अभिनेत्रीने प्रिंटेड ब्लॅक साडीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
फुल्ल स्लीव्ह ब्लाऊज आणि वेगवेगळी प्रिंटेड डिझाईन असलेली ब्लॅक साडी तिने घातली आहे.
न्यूड मेकअप करत सिंपल फोटो पोजेस देत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलंय.
सध्या गौरीच्या ह्या मकर संक्रांती स्पेशल फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
गौरी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक प्रसिद्ध बिझनेस वूमन सुद्धा आहे.
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून गौरी कुलकर्णीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
अभिनेत्री गौरी कुलकर्णीने या मालिकेत 'गौरी'ची भूमिका साकारली आहे.