मिल्खा सिंह यांच्या आठवणीत फरहान अख्तर भावूक...

फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह यांचे शुक्रवारी (१८ जून) रात्री निधन झाले. मिल्खा सिंह यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मिल्खा सिंह यांच्या जाण्याने पडद्यावर ‘मिल्खा सिंह’ ची भूमिका साकारलेल्या अभिनेता फरहान अख्तर याला मोठा धक्का बसला आहे.
मिल्खा सिंह यांच्या आठवणीत फरहान अख्तर भावूक...

मिल्खा सिंह यांच्या आठवणीत फरहान अख्तर भावूक...

Saam Tv 

पुणे: ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह Milkha singhs यांचे शुक्रवारी (१८ जून) निधन झाले. मिल्खा सिंह यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मिल्खा सिंह यांच्या जाण्याने पडद्यावर ‘मिल्खा सिंह’ ची भूमिका साकारलेल्या अभिनेता फरहान अख्तर Farhan Akhtar याला मोठा धक्का बसला आहे. Farhan Akhtar gets emotional on Milkha singhs death

या दुःखात फरहानने मिल्खा यांच्यासाठी एक भावूकपूर्ण संदेश Message लिहिला आहे. यात त्याने मिल्खा सिंह यांच्यावर आपले किती प्रेम होते, हे सांगितले आहे.

मिल्खा सिंह यांच्यासोबतचा एक फोटो बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने शेअर केला. या फोटोला त्याने सविस्तर शब्दता मांडले की ‘प्रिय, मिल्खा सिंह, तुम्ही आता आमच्या सोबत नाहीत. माझा विश्वास या गोष्टीवर बसत नाही. कदाचित हा माझ्या मनाचा एक भाग, जो तुमच्याकडून मला मिळाला आहे. आपण नेहमीच आमच्यात जिवंत राहाल. कारण तुमचे हृदय खूप मोठे होते. आपण मातीशी जोडलेले होतात.’

फरहानने आपल्या पोस्ट मध्ये पुढे लिहिले की, ‘तुम्ही स्वप्नांना सत्यात उतरवले. परिश्रम, सत्यता आणि मनाच्या दृढनिश्चयाने आपण जमीनवर पाय रोवून आकाशाला कसे स्पर्श करू शकता, हे आम्हाला शिकवल. आपण आमच्या सर्वांच्या जीवनला स्पर्श केला आहे. मी मनापासून तुम्हाला प्रेम करतो. ‘

हे देखील पहा -

मिल्खा सिंह आणि अभिनेता फरहान हे दोघे मिल्खा सिंह यांच्या बायोपिकचे काम सुरु असताना एकमेकांच्या भेटले होते. मिल्खा सिंह यांच्यावर बनलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहानने मिल्खा सिंहची मुख्य भूमिका साकारली होती.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com