हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा 'द ब्लफ' चित्रपटाच्या सेटवर जखमी झाली आहे. यापूर्वीही तिला शूटिंगदरम्यान जखमी झालेली होती. आता पुन्हा एकदा शुटिंगवेळी तिच्या गळ्याला जखम झाल्याचं समोर आलंय. नुकताच प्रियंकाने एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. त्यामध्ये तिच्या गळ्याला व्रण आलेले दिसत आहे. त्यानंतर तिची स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'द ब्लफ' या आगामी हॉलिवूड चित्रपटाचच्या शूटिंगदरम्यान प्रियांकासोबत ही घटना घडलेली आहे. सध्या ह्या चित्रपटाची शुटिंग ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे. शूटिंगवेळी तिच्या गळ्यावर खरचटल्याचे व्रण दिसत आहे. या घटनेत अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले की, "माझ्या जॉबमध्ये प्रोफेशनल धोकेही आहेत." हा फोटो शेअर केल्यानंतर चाहते चिंतेत पडले होते.
प्रियांकासोबत 'द ब्लफ' मध्ये कार्ल अर्बनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून ओटीटीवर रिलीज होणार 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका पती निक जोनास आणि लेक मालती मेरी यांच्याबरोबर भारतात सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी आली होती.
प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचं तर, 'द ब्लफ'सोबत प्रियंका 'हेड ऑफ स्टंट'मध्येही दिसणार आहे. प्रियांका चोप्रा फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ चित्रपटातही दिसणार आहे. तिच्यासोबत चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भटही दिसणार आहे. अद्याप चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालेली नाही. प्रियांका, कतरिना आणि आलिया या तिघींच्याही तारखा एकत्र मिळत नसल्यामुळे शुटिंग अद्याप सुरू झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.