Deepika Padukone Trolled : गरोदर दीपिकाने हाय हिल्स सँडल कॅरी केल्यामुळे नेटकरी भडकले, "तू प्रेग्नेंट आहेस ना ? मग..." म्हणत केली कानउघडणी

Deepika Padukone Flaunts Baby Bump : दीपिकाने नुकतंच मुंबईत पार पडलेल्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला उपस्थिती लावली होती.
Deepika Padukone Trolled : गरोदर दीपिकाने हाय हिल्स सँडल कॅरी केल्यामुळे नेटकरी भडकले, "तू प्रेग्नेंट आहेस ना ? मग..." म्हणत केली कानउघडणी
Deepika Padukone TrolledSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. दीपिकाने नुकतंच मुंबईत पार पडलेल्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला उपस्थिती लावली होती. तब्बल सहा महिन्यानंतर दीपिकाचा बेबी बंप फ्लाँट झालेला आहे. अनेकदा दीपिका बेबी बंपमुळे ट्रोलही झाली होती. अशातच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. या कार्यक्रमात दीपिकाने ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी केला होता. या अंदाजात ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसवर दीपिकाने हाय हिल्स सँडल कॅरी केली होती. यामुळे तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं आहे.

Deepika Padukone Trolled : गरोदर दीपिकाने हाय हिल्स सँडल कॅरी केल्यामुळे नेटकरी भडकले, "तू प्रेग्नेंट आहेस ना ? मग..." म्हणत केली कानउघडणी
Chandu Champion Collection : सांगलीच्या मुरलीधर पेटकर यांची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'ची एका आठवड्यात कमाई किती ?

‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचा १९ जूनला मुंबईमध्ये प्री-रिलीज इव्हेंट झाला. या इव्हेंटला प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोणसह सर्व स्टारकास्ट उपस्थित होते. सध्या गरोदर असलेल्या दीपिकाचा बेबी बंप या इव्हेंटमध्ये स्पष्टपणे दिसत होता. बेबी बंपमुळे अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल सुद्धा केले होते. अशातच आता पुन्हा एकदा दीपिका ट्रोल झाली आहे, कारण ठरलंय तिची हाय हिल सँडल... गरोदरपणामध्ये दीपिकाने हाय हिल्स सँडल कॅरी केल्यामुळे तिच्यावर चाहते नाराज झाले आहेत. "तू प्रेग्नेंट आहेस ना ?, मग हाय हिल सँडल का घातली ?" असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केले.

दीपिकाला नेटकरी म्हणतात, "गरोदरपणात इतकी हाय हिल्स सँडल घालणं चुकीचं आहे.", "तू सुंदर दिसण्यासाठी गरोदरपणात हाय हिल्स सँडल कॅरी करायला नव्हती हवी.", "तू प्रेग्नेंट आहेस ना ?, मग हाय हिल सँडल का घातली ?" सह अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट्स करत नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल केले आहे. इव्हेंटनंतर दीपिकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तिचे हे नवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नागआश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट येत्या २७ जूनला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मित झालेला हा चित्रपट बिगबजेट चित्रपटांपैकी एक आहे.

Deepika Padukone Trolled : गरोदर दीपिकाने हाय हिल्स सँडल कॅरी केल्यामुळे नेटकरी भडकले, "तू प्रेग्नेंट आहेस ना ? मग..." म्हणत केली कानउघडणी
Marathi Actor Dance Video: मराठी कलाकारांना 'अंगारो सा' गाण्याची भूरळ; अल्लू अर्जुन अन् श्रीवल्लीच्या गाण्यावर धरला ठेका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com