Sakshi Sunil Jadhav
नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याला केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी रॅली निघते. सगळ्या महिला घरात गुढी उभारुन बाहेर छान साड्या नेसून मिरवत असतात.
बऱ्याचदा अनेक महिलांना प्रश्न पडतो, तो म्हणजे जुन्या सांड्यांमध्ये दरवेळेस नवीन लूक कसा करायचा? चला पुढे जाणून घेऊयात.
घरात आजी किंवा आईकडे जपून ठेवलेल्या पैठणी, नऊवारी किंवा सहावारी साड्या यानेच तुम्ही सुंदर दिसू शकता. यासाठी काही सोप्या ट्रिकची गरज असते.
नऊवारी साडी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पोशाख आहे. सण, गुढीपाडवा किंवा लग्नसमारंभात नऊवारी साडी नेसल्याने पारंपरिक आणि सगळ्यात रेखीव लूक मिळतो.
सहावारी साडी हलकी आणि सोपी असल्यामुळे ती रोजच्या कार्यक्रमांमध्ये किंवा फंक्शनमध्ये सहज नेसता येते.
जुन्या पैठणी किंवा सिल्क साडीला मॉडर्न ब्लाउजसोबत पेअर केल्यास लूक अधिक स्टायलिश दिसतो.
नथ, चंद्रहार, ठुशी किंवा गजऱ्यासारखे पारंपरिक दागिने घातल्याने साडीचा लूक जास्त खुलतो. तुम्ही यामध्ये ठसठशीत दागिन्यांचा वापर करा.
जर साडी वापरुन खूप जुनी झाली असेल, तर तिच्यापासून ड्रेस, लेहेंगा किंवा दुपट्टा तयार करून नवीन ड्रेश शिऊन वापरता येईल.
पारंपरिक साड्यांमध्ये फोटोशूट केल्याने एकदम क्लासिक आणि सांस्कृतिक लूक मिळतो. त्यासाठी फक्त तुमचे दागिने रेखीव असले पाहिजेत.
घरात ठेवलेल्या आजीच्या पैठणी, नऊवारी किंवा सहावारी साड्या कपाटात ठेवण्यापेक्षा त्यांना नवीन स्टाइल देऊन वापरा.